यापूर्वी कोटयवधी रूपयांची रक्कम सल्ल्यापोटी विविध कंपन्यांनी घेतली असून याकामामधून पालिकेचे नुकसानच झाले आहे. महात्मा फुले जन आरोग्या योजनेपोटी शासनाकडून रक्कम मिळाली आहे. पालिकेचे रूग्णालय सक्षम करणे, डॉक्टर व अन्य आवश्यक भरती करणे सुरू आहे. शहरी गरीब योजना राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात सुरू झाली असून या योजनेमुळे शहरातील गरजू गरीब नागरिक त्याचा लाभ घेत आहेत. ही योजना काही खाजगी कंपन्यांच्या हितसाठी बंद करण्याचा डाव असून मुख्य सभा व स्थायी समिती यांची परवानगी न घेता परस्परपणे खाजगीकरणाची कार्यवाही सुरू केली असून ही प्रक्रिया तातडीने स्थगित करण्यात यावी अशी मागणी धुमाळ यांनी पालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
आरोग्य विमा संरक्षण योजनेसाठीची सल्लागार नेमणूकीची प्रक्रिया स्थगित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:15 IST