शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपटांच्या पोस्टरचा खजिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 03:52 IST

संजोग, रोटी, आलम आरा, रझिया सुलतान यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीने सुवर्णकाळ अनुभवला. या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आणि चित्रसृष्टीला नवे आयाम प्राप्त करून दिले.

पुणे : संजोग, रोटी, आलम आरा, रझिया सुलतान यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीने सुवर्णकाळ अनुभवला. या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आणि चित्रसृष्टीला नवे आयाम प्राप्त करून दिले. या चित्रपटांच्या पोस्टर्सच्या रुपाने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात मोलाची भर पडली आहे. संग्रहालयाला भारतीय चित्रपटांची अडीच हजार पोस्टर प्राप्त झाली आहेत. यामध्ये मुघल-ए-आझम या चित्रपटाच्या ६ शीटच्या दुर्मिळ पोस्टर्सचा समावेश आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आज ५७ वर्षे पूर्ण होत असून, यानिमित्ताने चित्रपटांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.संग्रहालयाला भारतीय चित्रपटांची अडीच हजार पोस्टर मिळाली आहेत. दीड हजार हिंदी चित्रपटांचे पोस्टर व उर्वरित पोस्टर ही तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम या भाषेतील चित्रपटांची आहेत. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ही पोस्टर तयार करण्यात आली होती. संग्रहामध्ये ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ९० चित्रपटांच्या पोस्टरचा समावेश आहे. ५ आॅगस्ट १९६० रोजी प्रदर्शित झालेल्या मुघल-ए-आझमच्या पोस्टरचा आकार १० फूट बाय ५ फूट एवढा आहे.भारतीय चित्रपटांच्या इतिहासाच्या दृष्टीने हा ठेवा महत्त्वाचा आहे. चित्रपट संग्रहालय हा ठेवा जपून ठेवणार आहे, जेणेकरून पुढील काळात हा ठेवा देशाच्या चित्रपट संस्कृतीची साक्ष देईल. चित्रपट कलाकार, दिग्दर्शक; तसेच रसिकांकडे चित्रपटासंबंधीचे साहित्य, फिल्म असेल, तर ते त्यांनी संग्रहालयाकडे जतन करण्यासाठी द्यावे, अशी माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली.संपूर्ण रामायण (१९६१), श्री गणेश (१९६२), वीर अभिमन्यू (१९६५), शंकर सती अनुसया (१९६५), वीर भीमसेन (१९६४), लक्ष्मी नारायण (१९५१), बलराम श्रीकृष्ण (१९६८) या पौराणिक चित्रपटांची पोस्टरही उपलब्ध झाली आहेत.