शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टल पासपोर्टची पुण्याला प्रतीक्षाच

By admin | Updated: February 2, 2017 03:38 IST

पारपत्रासाठी (पासपोर्ट) अर्ज करण्यापासून ते पासपोर्ट मंजूर करण्याचे काम आता टपाल विभागाच्या माध्यमातून केले जाणार असून, राज्यात नगर व कोल्हापूरात असे केंद्र

पुणे : पारपत्रासाठी (पासपोर्ट) अर्ज करण्यापासून ते पासपोर्ट मंजूर करण्याचे काम आता टपाल विभागाच्या माध्यमातून केले जाणार असून, राज्यात नगर व कोल्हापूरात असे केंद्र सुरु करण्याचा प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे. दरम्यान, पुणे टपाल कार्यालात मात्र असे केंद्र सुरु करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती टपाल विभागातील सूत्रांनी दिली. या बाबत प्रादेशिक पारपत्र अधिकारी अतुल गोतसुर्वे म्हणाले, नगर व कोल्हापूर येथील टपाल कार्यालयात पोस्टल पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्यात यावे असा प्रस्ताव दहा दिवसांपूर्वीच केंद्र सरकारला पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास तेथे तत्काळ केंद्र सुरु करण्यात येईल. पोस्टाच्या सक्षम अधिकाऱ्याकडेच पासपोर्ट मंजुर करण्याची जबाबदारी द्यावी, की प्रचलित पद्धतीने पासपोर्टचे काम करावे याबाबत अजून निर्णय झालेला नाही. मात्र, पोस्टाच्या अधिकाऱ्याला तसा अधिकार द्यावा काय, यावर चर्चा सुरु आहे. पोस्टल पासपोर्ट सेवा केंद्रास मंजुरी मिळाल्यास, आम्ही तत्काळ केंद्र सुरु करण्यास तयार असल्याचे पुणे विभागाचे पोस्टमास्टर जनरल गणेश सावळेश्वरकर यांनी सांगितले. - टपाल केंद्राच्या माध्यमातून पासपोर्ट वितरणाचे काम करण्याची निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला असून, पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत गुजरात व कर्नाटकमध्ये अशी दोन केंद्र सुरु झाली आहेत. - सध्या अनेक ठिकाणी पासपोर्टसाठी अर्ज व विविध कागदपत्रांची छाणनी करण्याचे काम एका खासगी कंपनीच्या सेवे मार्फत केले जाते.- पुण्यातही मुंढवा येथे पासपोर्ट कार्यालयात असे काम केले जाते. मात्र त्यासाठी पासपोर्ट विभागाचा एक सक्षम अधिकारी त्यावर देखरेख करतो. त्याच्या मंजुरी नंतरच प्रादेशिक कार्यालयाकडे पासपोर्ट तयार करण्यासाठी संबंधित अर्जदाराची माहिती पाठविण्यात येते.४मात्र, टपाल विभागात उभारण्यात येणाऱ्या ‘पोस्टल पासपोर्ट सेवा केंद्रा’च्या माध्यमातून ही सर्व कामे टपाल विभागातील सक्षम अधिकारी करतील. पासपोर्टच्या नियमातच तसा बदल करण्याच्या हालचाली केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू आहेत.