शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्स अ‍ॅपच्या जमान्यात पोस्टसेवाही अपडेट

By admin | Updated: October 9, 2014 05:12 IST

समाजाच्या सुख-दु:खांशी पोस्ट कार्यालय एकरूप झाले आहे. व्हॉट्स अ‍ॅपच्या जमान्यात पोस्टसेवाही अपडेट आहे

पुणे : समाजाच्या सुख-दु:खांशी पोस्ट कार्यालय एकरूप झाले आहे. व्हॉट्स अ‍ॅपच्या जमान्यात पोस्टसेवाही अपडेट आहे. या सेवेचा गौरव म्हणून ९ आॅक्टोबर हा दिवस ‘जागतिक टपाल दिन’ म्हणून साजरा केला जातो. ९ आॅक्टोबर १८८४ रोजी म्हणजेच सुमारे १३० वर्षांपूर्वी भारतीय पोस्टसेवेला सुरुवात झाली. दहा-बारा वर्षांपूर्वीपर्यंत पोस्ट सेवेला भारतीय समाजाची जीवनवाहिनी समजले जात होते; परंतु आंतरदेशीय पत्र, पिवळे पोस्ट कार्ड या गोष्टी सध्याच्या फेसबुक आणि व्हॉट्स अ‍ॅपच्या जमान्यातील पिढीच्या गावीही नाहीत.कधी काळी पोस्ट कार्यालयात दोन पाळ्यांमध्ये काम चालत असे. यावरूनच पोस्ट कार्यालयाच्या कामाचा आवाका लक्षात येतो. त्या वेळी मनिआॅर्डर आणि तारसेवेला विशेष मागणी होती. आंतरदेशीय पत्र, साधे पत्र, पाकिटाला मोठी मागणी होती. रक्षाबंधनाच्या काळात तर राख्या पाठविण्यासाठी मोठी गर्दी होत असे. दिवाळी, नववर्ष काळात भेटकार्ड, शुभेच्छा कार्डांची अशीच अवस्था असे. त्या वेळी वर्षातून केवळ १२ सुट्ट्या पोस्टातील कर्मचाऱ्यांना मिळत असत. माहिती मिळविण्यासाठी अनेकांचा त्या वेळी पोस्ट कार्यालयात राबता असे. आंतरदेशीय पत्र, पिवळे पोस्ट कार्ड, मनिआॅर्डर या ‘फर्स्ट क्लास’ प्रकारातील काम सध्या १० टक्केही राहिलेले नाही. तर, ‘सेकंड क्लास’ प्रकारातील म्हणजे ‘बुकपोस्ट’चे काम जवळपास ९० टक्क्यांहून अधिक प्रमाणात पोस्ट कार्यालयाला करावे लागत आहे. मात्र, ‘सेकंड क्लास’ कामांमुळे पोस्ट कार्यालयाच्या उत्पन्नात कोणत्याही प्रकारे वाढ होत नाही. पोस्ट कार्डावर अनुदान असल्यामुळे १ रुपया ६७ पैशांचे पोस्ट कार्ड पोस्ट कार्यालयाला ५० पैशांत विकावे लागते. तसेच, २५ पैशांची तिकिटे काही बुकपोस्टसाठी लागतात; मात्र चलनातून २५ पैसे केव्हाच गायब झाल्यामुळे त्याचाही फायदा पोस्टाला होताना दिसून येत नाही. मात्र, तरीही ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या पोस्टसेवेने काळानुरूप विविध योजना सुरू करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.