शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सप्टेंबरच्या तुलनेत मार्चमधील पॉझिटिव्हिटी रेट कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:11 IST

चाचण्या वाढल्या : एप्रिलमध्ये सर्वोचच बिंदू गाठण्याची शक्यता लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या दररोज नवा उच्चांक ...

चाचण्या वाढल्या : एप्रिलमध्ये सर्वोचच बिंदू गाठण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या दररोज नवा उच्चांक प्रस्थापित करत आहे. पॉझिटिव्हिटी रेट २३-२४ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. यापूर्वी १६ सप्टेंबर २०२० रोजी सर्वाधिक दैनंदिन कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या आणि सर्वाधिक पॉझिटिव्हिटी दर नोंदवला गेला होता. १६ सप्टेंबर रोजी पॉझिटिव्हीटी रेट ३२ टक्के इतका होता. मार्च महिन्यात आतापर्यंत २४ टक्के इतका पॉझिटिव्हिटी रेट नोंदवला गेला आहे. गंभीर रुग्णांच्या तुलनेत सौम्य लक्षणे किंवा लक्षणेरहित रुग्णांचे प्रमाण जास्त आहे.

मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यावर सर्वांचेच धाबे दणाणले. रुग्णसंख्या आणि मृत्यूदरही वाढता राहिला. ऑक्टोबर महिन्यापर्यंत रुग्णवाढीचा आलेख सातत्याने वाढता राहिला. नोव्हेंबर ते जानेवारी या काळात आलेख काहीसा स्थिरावला. मात्र, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या अचानक वाढायला सुरुवात झाली. मार्चमधील दैनंदिन आकडेवारीनुसार रुग्णसंख्या अडीच हजारांचा टप्पा ओलांडून पुढे गेली आहे. सप्टेंबर आणि मार्च या दोन महिन्यांची तुलना करायची झाल्यास, सप्टेंबरमध्ये चाचण्यांची संख्या ६-७ हजार इतकी होती. मार्च महिन्यात चाचण्यांचे दर दिवशीचे प्रमाण १२ ते १४ हजार इतके आहे. चाचण्या वाढविल्यास जास्तीत जास्त रुग्णांचे वेळेत निदान शक्य होते. त्यामुळे चाचण्या आणि लसीकरण यांचा वेग वाढवणे गरजेचड असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

सप्टेंबर महिन्यात गंभीर रुग्णांची संख्या आणि दररोजच्या मृत्यूंची संख्याही अधिक होती. ही संख्या ९०० ते ९५० इतकी होती, तर दैनंदिन मृत्यू ४०-४५ इतके होते. मार्च महिन्यात हीच संख्या अनुक्रमे ३००-४०० आणि १०-२० इतकी आहे. त्यामुळे साथ वेगाने पसरत असली तरी तीव्रता कमी झाली आहे, असा निष्कर्ष काढला जात आहे. मात्र, सक्रिय रुग्णांचे प्रमाण सप्टेंबरच्या तुलनेत जास्त आहे. १७ हजारांहून हा आकडा २२ हजारांच्या पुढे गेला आहे. गंभीर रुग्णांची संख्या १५ मार्च रोजी ३७० होती, २१ मार्च रोजी ती ५१९ इतकी नोंदवली गेली. एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोनाची साथ आजवरचा सर्वाधिक उच्चांक गाठेल, असा वैद्यकतज्ज्ञांचा कयास आहे. त्यामुळे मृत्युदर, रुग्णसंख्या आणि गंभीर रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी निष्काळजीपणे वावरून संकटाला आमंत्रण देऊ नये, असे आवाहन केले जात आहे.

----------

सप्टेंबरमधील आकडेवारी

चाचण्या रुग्ण गंभीर रुग्ण मृत्यू

१५ ५४९४ १६९१ ९२९ ४३

१६ ७१६३ २१२० ९३६ ४३

१७ ६५४९ १९६४ ९३९ ४५

१८ ६८२९ १८९१ ९४१ ६१

१९ ५९१९ १६५८ ९५७ ३९

२० ६०६७ १७०० ९६१ ३८

२१ २६९७ ८८४ ९५२ ३७

--------

मार्चमधील आकडेवारी

चाचण्या रुग्ण गंभीर रुग्ण मृत्यू

१५ ७२६६ १०८२ ३७० १०

१६ ८०४४ १९२५ ३९४ ७

१७ ११२३० २५८७ ४२५ ११

१८ ११८३५ २७५२ ४४० २२

१९ १२६२५ २८३४ ४९९ १५

२० १४४८४ ३१११ ५३८ १६

२१ १२९२९ २९०० ५१९ २०