शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

वस्तू सेवाकरामुळे सकारात्मक बदल

By admin | Updated: June 21, 2017 06:18 IST

वस्तू आणि सेवाकर’ (जीएसटी) हा भारतीय संघराज्याच्या संरचनेतील आणि ७० वर्षांनंतरचा खूप मोठा बदल आहे. ही करप्रणाली अतिशय योग्य नसली,

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘वस्तू आणि सेवाकर’ (जीएसटी) हा भारतीय संघराज्याच्या संरचनेतील आणि ७० वर्षांनंतरचा खूप मोठा बदल आहे. ही करप्रणाली अतिशय योग्य नसली, तरी सकारात्मक असून, यामुळे भारताची वेगाने प्रगती होईल, एकूण देशांतर्गत उत्पादनामध्ये(जीडीपी) ०.९ ते १.७ टक्के इतकी वाढ होऊ शकेल आणि सामान्य माणसाचे जीवन सुकर होईल, असे मत आंध्र प्रदेश अर्थ खात्याचे माजी मुख्य सचिव डॉ. व्ही. भास्कर यांनी वक्त केले.‘वस्तू आणि सेवाकर क्रांती - आव्हाने आणि संधी’ या विषयावर, पुणे इंटरनॅशनल सेंटर(पीआयसी) तर्फे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी डॉ. भास्कर बोलत होते. ‘पीआयसी’चे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर, मराठा चेंबर आॅफ कॉमर्सचे सरव्यवस्थापक अनंत सरदेशमुख या वेळी उपस्थित होते. डॉ.प्रमोद चौधरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.डॉ. भास्कर म्हणाले, सध्याची अप्रत्यक्ष करांची रचना अतिशय गुंतागुंतीची आणि गोंधळाची आहे. करांवर कर, सेस, अनेक कर आणि सुमारे ४६ कर दर रचना असल्याने सामान्य माणूस आणि उत्पादक व सेवा पुरवठादार गोंधळात आहेत. राज्याने वस्तूंवर आणि सेवांवर केंद्राचा कर अशी अवघड प्रणाली आहे. ही रचना नव्या करामुळे सुरळीत होईल. करांवर कर नसल्याने हॉटेलिंग आणि घर घेणे थोडे स्वस्त होईल.ते पुढे म्हणाले की, भारतामध्ये सध्या २३ टक्के लोक गरीब आहेत. शिक्षणावरचा खर्च कमी आहे आणि आरोग्यावरही, जगातल्या अनेक देशांपेक्षा कमी खर्च केला जातो. नीती आयोगाच्या अंदाजानुसार सध्याचा ७ टक्के विकासदर कायम राहिल्यास, २०३२ पर्यंत भारतामध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या ५ टक्के असेल. मात्र २०३२ पर्यंत दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या शून्य करायची असल्यास, भारताला विकास दर १० टक्क्यांपर्यंत वाढवावा लागेल. ‘वस्तू आणि सेवाकर’ आल्यामुळे वेगाने प्रगती होईल. परदेशी गुंतवणूक वाढेल. व्यवसाय सुलभ होईल, सगळी बाजारव्यवस्था एकसंध होईल, त्यामुळे विकास दरामध्ये वाढ होईल.