शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंधाऱ्या कोठडीप्रमाणे दयनीय अवस्था

By admin | Updated: March 14, 2016 01:17 IST

शासकीय कर्मचाऱ्यांना हक्काचा निवारा देण्यासाठी शासकीय वसाहती उभ्या राहिल्या खऱ्या... पण या वसाहतीतील सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले

शासकीय कर्मचाऱ्यांना हक्काचा निवारा देण्यासाठी शासकीय वसाहती उभ्या राहिल्या खऱ्या... पण या वसाहतीतील सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधाही मिळेनाशा झाल्या़ वसाहती बकाल झाल्या. या वसाहतींना ‘लोकमत टीम’ने ‘आॅन द स्पॉट’ पाहणी करून समोर आणले ज्वलंत वास्तव.प्रवीण गायकवाड ल्ल शिरूरकाम एकविसाव्या शतकातले, निवासस्थान मात्र एकोणिसाव्या शतकातले. कौलारू, दगड-मातीची अरुंद घरे, घरात जाण्यास साडेपाच फुटी दरवाजा, खिडक्यांचा अभाव, यामुळे अंधार कोठडीप्रमाणे असलेल्या अतिशय दयनीय अवस्थेतील घरांमध्ये (वसाहतीमध्ये) येथील पोलीस राहतात. खोल्या वीस, स्वच्छतागृह फक्त चार, तीही अस्वच्छ. तसेच, घाणीच्या सान्निध्यात ‘मजबुरी आहे काय करणार,’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया येथे राहणारे कर्मचारी व्यक्त करतात. ९ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या प्रशासकीय इमारतीच्या बाजूलाच पोलिसांची वसाहत आहे. शेजारीच पोलीस स्टेशन आहे. २४ तास ड्युटीवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसमोर एकविसाव्या शतकातील आव्हाने आहेत. यासाठी पोलीस ठाण्यात इंटरनेट सेवा, गुन्ह्याच्या तपासासाठी डिजिटल सुविधा आदींची व्यवस्था आहे. वाढते नागरीकरण, वाढता परिसर यामुळे कामाचाही मोठा व्याप पोलिसांना आहे. अशात काम आटोपून घरी जाणे म्हटले, तर १८९४ मध्ये बांधलेल्या कोंबड्याच्या खुराड्याप्रमाणे असणाऱ्या खोलीमध्ये पोलिसांना आसरा घ्यावा लागतो. घर मोठे नसावे, मात्र किमान त्यात चांगला श्वास घेण्यासाठी खिडक्या तरी असाव्यात. पोलीस वसाहतीमध्ये खिडक्यांच्या अभावाने व दाराची उंची कमी असल्याने सुख मिळत नाही.राहायला छप्पर नसेल, तर काय काम करणार ?नीलेश काण्णव ल्ल घोडेगावघोडेगाव येथे असलेल्या पोलीस निवासस्थानाची अतिशय दुरवस्था झाली आहे. सध्याची इमारत दुरुस्त करावी, अशी मागणी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम खात्याकडे करण्यात आली आहे. मात्र निधी उपलब्ध नसल्यामुळे दुरुस्ती करता येत नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते. दिवस व रात्री काम करून थकणाऱ्या पोलिसांच्या डोक्यावरचे छप्पर चांगले नसेल, तर तो काय काम करणार, अशी संतप्त प्रतिक्रया काही पोलिसांनी व्यक्त केली. सुमारे २५ वर्षांपूर्वी ही पोलीस निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. दरम्यान, तीन इमारतींमध्ये २४ फ्लॅट आहेत. हे फ्लॅट ३०० ते ३५० चौरस फुटाच्या अंत्यत छोट्या आकाराचे आहेत. यातील खोल्यांची साईजही खूप छोटी आहे. त्यात या इमारतीची दुरवस्था झाली असून, खिडक्यांच्या काचा फुटलेल्या, दरवाजे तुटलेले, रंग निघून गेलेला, ड्रेनेजची पाइपलाइन फुटलेली, उघड्यावर पाणी साठलेले, अशी अवस्था आहे. या इमारतींना संरक्षक भिंत नसल्यामुळे पलीकडे असलेल्या ओढ्यातून अनेक वेळा साप येतात, त्यांचाही धोका असतो.