शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

लोकलमध्ये महिला प्रवाशांची कुचंबणा

By admin | Updated: December 23, 2015 00:08 IST

नोकरी व शिक्षणासाठी लोकलने शहराच्या आसपासच्या उपनगरामध्ये प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या मोठी असून रेल्वेस्थानकांवर त्यांच्यासाठी स्वच्छतागृहांची चांगली व्यवस्था नसल्याचे

पुणे : नोकरी व शिक्षणासाठी लोकलने शहराच्या आसपासच्या उपनगरामध्ये प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या मोठी असून रेल्वेस्थानकांवर त्यांच्यासाठी स्वच्छतागृहांची चांगली व्यवस्था नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहाणीत समोर आले आहे.पुण्यातून रोज लोणावळा, मळवली, कार्ले, देहूरोड यांसारख्या ठिकाणी अनेक मुली व महिला प्रवास करतात. हा प्रवास १० ते २० मिनीटांपासून, दीड ते दोन तासांपर्यंत असतो. या दरम्यान महिलांना स्वच्छतागृहांची आवश्यकता भासते. लोकलचा प्रवास हा ३ तासांहून कमी कालावधीचा असल्याने लोकलमध्ये स्वच्छतागृहे नसतात, असे कारण प्रशासनाकडून दिले जाते. मात्र गर्भधारणा असलेली महिला किंवा मासिक पाळी चालू असेल तर अशावेळी स्वच्छतागृह आवश्यक असतेच. त्यामुळे प्रवास जरी कमी कालावधीचा असला तरीही लोकलमध्ये ही सुविधा असायला हवी, असे मत लोकलने प्रवास करणाऱ्या महिलांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले. यामध्येही केवळ स्वच्छतागृहांची सुविधा करून उपयोग नाही तर त्याची स्वच्छताही राखली जायला हवी, असेही या महिला म्हणाल्या. अशाप्रकारे स्वच्छतागृहाच्या कमतरतेमुळे अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत असल्याचेही महिलांकडून समजले. लोकलच्या डब्यांबरोबरच रेल्वेस्थानकावरही स्वच्छतागृहांची व्यवस्था चांगली नाही. त्यामुळे तातडीच्या वेळी स्थानकावर उतरून जायचे ठरविल्यास कधी त्याला टाळे ठोकल्याचे दिसते, तर कधी ही स्वच्छतागृहे तुंबलेली असल्याने त्याचा वापर काय, पण आत जाणेही कठीण अशी परिस्थिती असते. त्यामुळे महिलांच्या आरोग्याबाबत रेल्वे प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. याबरोबरच सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतागृहांचा वापर करणे हा आपला अधिकार असतानाही काही स्थानकांवर मात्र स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी नागरिकांकडून शुल्क आकारले जात असल्याची खंतही व्यक्त केली.