शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

पापुद्य्रांतून साकारले भावविश्व

By admin | Updated: December 30, 2014 00:12 IST

साधारणपणे कोलाज म्हटले, की कागदाचे छोटे छोटे कपटे करून चित्र तयार करणे, विविध भाज्यांचा उपयोग करून वेगवेगळे प्राणी, त्यांचे चेहरे तयार करणे एवढेच डोळ्यांसमोर येते.

पुणे : साधारणपणे कोलाज म्हटले, की कागदाचे छोटे छोटे कपटे करून चित्र तयार करणे, विविध भाज्यांचा उपयोग करून वेगवेगळे प्राणी, त्यांचे चेहरे तयार करणे एवढेच डोळ्यांसमोर येते. याशिवाय आत्ताच्या काळातील पिकासा किंवा स्मार्टफोन्समधील अ‍ॅप्सवरून तयार केलेले कोलाज आपल्याला ठाऊक असते. परंतु, कांदा आणि लसणाच्या पापुद्य्रांपासूनही तयार होऊ शकते, हे दाखवून दिले आहे संजय शिंदे यांच्या अनोख्या कलाकृतीतून. या प्रत्येक चित्रात पापुद्य्रांच्या विविध छटांचा उपयोग करून साकारलेले व्यक्तीच्या, प्राण्यांच्या, देवदेवतांच्या डोळ्यांतील भाव हे या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य आहे.या कांदा-लसूण पापुुद्य्रांच्या कोलाज चित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व येथील कलादालनात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी शिल्पकार विवेक खटावकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, शिल्पकार मुरली लाहोटी, उमेश गुप्ते, सुचित्रा कवठेकर, सुनीती माधव उपस्थित होते.विविध प्रकारची फुलपाखरे, बैलांची झुंज, झाडाखाली रवंथ करत बसलेली गाय, पिल्लाला खाऊ घालणारे पक्षी, कुत्रा, मांजर, सिंह, उधळलेला घोडा, डरकाळी फोडणारा वाघ हे प्राणिविश्व आणि त्याबरोबरच नाचणारे, दैनंदिन काम करणारे आदिवासी, शेतात काम करत असलेल्या स्त्रिया, दोरीवरच्या उड्या मारणाऱ्या मुली, कोंबड्यांना दाणे टाकणारी बाई, स्पर्धेत धावणारे घोडे, हातगाडी ओढून नेणारा माणूस अशी विविध मानवचित्रे या प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत. हे प्रदर्शन ३१ तारखेपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत खुले आहे. (प्रतिनिधी)टिपले सुंदर भावया प्रदर्शनात वेगवेगळ्या पद्धतीचे गणपती, सरस्वती, महाभारतातील अर्जुनाला गीता सांगणारा कृष्ण, तसेच राधा-कृष्ण, गौतम बुद्ध, संत मीरा अशा देवदेवता, तसेच घोड्यावर स्वार असलेले शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, पं. भीमसेन जोशी, महात्मा गांधी, मुलांमध्ये रमलेले चाचा नेहरू, माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे ही विविध व्यक्तिचित्रे व त्यांच्या डोळ्यांतील भाव अतिशय सुंदर साकारले आहेत. आज अशा प्रकारचे धाडस कोणी करत नाही. परंतु, ही कलाकृती जतन करण्यासाठी स्वतंत्र कलादालनाची गरज आहे आणि ही चित्रे जागतिक पातळीवर पोहोचण्याची गरज आहे.- विवेक खटावकर, शिल्पकार