शहरं
Join us  
Trending Stories
1
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
2
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
3
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
4
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
5
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
6
"झारखंडमध्ये करण्यात आली रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी'; लव्ह जिहादवर भाष्य करत PM मोदी जोरदार बरसले
7
उद्धव ठाकरे, संजय राऊत परदेशात; १ जूनच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी मारणार?
8
रियान परागने सारा-अनन्याचे हॉट फोटो सर्च केले; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
9
"मी पण कलेक्टर बनणार"; टीव्हीवर सूर्यवंशम सिनेमा पाहून UPSC परीक्षा दिली अन्...
10
तरुणी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
11
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
12
मुंबई कोस्टल रोडवर श्रद्धा कपूरने चालवली Lamborghini; म्हणाली, 'लेट नाईट ड्राईव्ह...'
13
सेन्सेक्स-निफ्टीनं तेजी गमावली; डिव्हिस लॅब्सचे शेअर वाढले, अदानी समूहाचे सर्व शेअर पडले
14
मतमोजणीपूर्वी १ जूनला INDIA आघाडीची बैठक बोलावण्यामागे खर्गे आणि काँग्रेसची अशी आहे रणनीती
15
२२व्या वर्षी अवनीत कौर झाली Engaged? बोटातील रिंग दाखवत म्हणाली- "चांगल्या गोष्टी..."
16
"अल्पवयीन आरोपीसोबत आमदाराचाही मुलगा होता"; पुणे प्रकरणात नाना पटोलेंचा गंभीर आरोप
17
४ जूननंतर नितीश कुमार घेऊ शकतात मोठा निर्णय; तेजस्वी यादवांच्या नव्या दाव्यामुळे उडाली खळबळ
18
'रुखी सुटी रोटी..' गाण्यावर भगरे गुरुजींच्या लेकीचा इलेक्ट्रिफायिंग डान्स, व्हिडीओ बघाच
19
३१ मे पर्यंत पूर्ण करा Aadhaar-PAN शी निगडीत 'हे' काम, अन्यथा भरावे लागतील दुप्पट पैसे
20
१० दिग्गजांनी जाहीर केले वर्ल्ड कपचे सेमीफायनलिस्ट; टीम इंडियावर सर्वांनी दाखवला विश्वास

भीमा, मुळा-मुठा नदीला प्रदूषणाचा विळखा

By admin | Published: January 14, 2017 3:14 AM

तालुक्यात भीमा आणि मुळा-मुठा नदीतील प्रदूषण वाढलेले आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी या नद्यांचे पात्र दुथडी भरुन वाहत होते.

दौंड : तालुक्यात भीमा आणि मुळा-मुठा नदीतील प्रदूषण वाढलेले आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी या नद्यांचे पात्र दुथडी भरुन वाहत होते. मात्र वाळूमाफियांनी बेसुमार केलेल्या वाळूउपशामुळे नद्यांच्या पात्रात मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी वाळूचे डोंगर साचलेले आहेत. पाण्यावर जलपर्णी साचली असून पाणी प्रदूषित झाले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्र ऐरणीवर आला आहे. तालुक्यात मुळा-मुठा आणि भीमा नदीचे साधारणत: अंदाजे ८० ते ८५ किलोमीटर अंतर आहे. नदीपात्रावर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे उभारलेले आहेत. मात्र, नदीपात्रात ठिकठिकाणी जलपर्णी साचली असल्याने या नद्यांचे आणि जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ही जलपर्णी कुजून असल्याने दुर्गंधी पसरली असून, डासांचाही उपद्रव वाढला आहे.पुणे आणि पिंपरी परिसरातील वाहून येणारे सांडपाणी यामुळे नदीपात्रातील पाणी दूषितझाले आहे.महिला धुणी भांडी करण्यासाठी नदीवर गेल्यानंतर नदीपात्रातील पाण्यामुळे हाताला पुरळ आणि खाज येणे असे प्रकार होतात. जनावरेही हे पाणी पिण्याचे टाळतात. वाळूमाफियांनी यांत्रिकी पद्धतीने मोठ्या प्रमाणात वाळूउपसा केल्याने यांत्रिकी बोटीतील आॅईल नदीपात्रात पसरुन तेलाचा तवंग पाण्यावर पसरला आहे. दुसरीकडे शहरी भागातील गटारीतील पाणीदेखील नदीपात्राला जाऊन मिळत आहे. (वार्ताहर)