शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पालिका पोटनिवडणुकीत मतदान प्रक्रिया शांततेत

By admin | Updated: January 19, 2015 01:44 IST

महानगरपालिकेच्या कोथरूड येथील प्रभाग क्रमांक २६ व हडपसर येथील प्रभाग क्रमांक ४६च्या पोटनिवडणुकीसाठी आज शांततेमध्ये मतदान पार पडले.

कोथरूड/हडपसर : महानगरपालिकेच्या कोथरूड येथील प्रभाग क्रमांक २६ व हडपसर येथील प्रभाग क्रमांक ४६च्या पोटनिवडणुकीसाठी आज शांततेमध्ये मतदान पार पडले. कोथरूडच्या प्रभागामध्ये ४२.३३ टक्के तर हडपसरच्या प्रभागामध्ये ४८.४ टक्के इतके मतदान झाले. दोन्ही प्रभागाच्या मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी प्रभाग क्रमांक २६ मधील काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर व प्रभाग क्रमांक ४६मधील शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी पक्षांतर केल्याने नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्या दोन जागेकरिता पोटनिवडणूक झाली. सकाळपासून मतदानाला संथगतीने सुरुवात झाली होती. कोथरूडमध्ये सकाळी ९.३० वाजता ६ टक्के मतदान झाले होते. दुपारी ते १५ टक्क्यांपर्यंत गेले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ४२.३३ टक्के मतदान झाले. रविवार सुट्टीचा दिवस असूनसुद्धा दुपार पर्यंत या भागात मतदानात निरुत्साह जाणवत होता. मतदान केंद्रातील खोल्या रिकाम्याच होत्या. शेवटच्या दोन तासांतच ७ टक्के मतदान झाले. कोणत्याही ठिकाणी गैरप्रकार आढळला नाही, एकंदरीत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजय दहीभाते यांनी दिली.हडपसरच्या प्रभागामध्ये दुपारी साडेअकरापर्यंत १५ टक्के झाले. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ३४ टक्के व शेवटी ४८.४ टक्के मतदान झाले. या प्रभागात एकूण २९,१११ मतदार होते त्यापैकी १२,३२४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादी व काँग्रेस त्याचप्रमाणे शिवसेना व भाजपाने ही निवडणूक स्वतंत्रपणे लढविली. तर जनविकास आघाडी करून प्रमोद भानगिरे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. मनसेकडून उमेदवारच नसल्याने प्रमुख चार पक्षांच्या उमेदवारांसह एक अपक्ष उमेदवार रिंगणात होता.