शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मतपत्रिका मिळाली नसतानाही मतदान

By admin | Updated: March 11, 2016 01:51 IST

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत अनेक मतदारांनी मतपत्रिका मिळाली नसल्याचे अर्ज दिले असून, त्यांपैकी काही जणांच्या नावाने अगोदरच मतदान झाल्याचे दिसून येत

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत अनेक मतदारांनी मतपत्रिका मिळाली नसल्याचे अर्ज दिले असून, त्यांपैकी काही जणांच्या नावाने अगोदरच मतदान झाल्याचे दिसून येत आहे़ मसापच्या निवडणूक प्रक्रिया कडक करण्याचा प्रयत्न आम्ही या वेळी केला असून, कोणताही गैरप्रकार उघडकीस आल्यास त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड़ प्रताप परदेशी आणि अ‍ॅड़ सुभाष किवडे यांनी सांगितले़गेल्या महिनाभरापासून मसापची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे़ १३ जिल्ह्यांत ११ हजार २७७ मतदार आहेत़ मतदारयादीत अनेकांची नावे दोनदा आली आहेत़ त्यांना दोन-दोन मतपत्रिका रवाना झाल्या आहेत़ त्यातील काही मतपत्रिकांद्वारे मतदानही करण्यात आले आहे़ त्याच वेळी जवळपास १२० हून अधिक जणांनी आपल्याला मतपत्रिका मिळाली नसल्याचे अर्ज केले आहे़ दुबार मतपत्रिकेसाठी अर्ज करण्याची मुदत ८ मार्चपर्यंत होती़ याबाबत निवडणूक अधिकारी अ‍ॅड़ प्रताप परदेशी यांनी सांगितले की, मतदान यादीत ज्यांची नावे दोनदा आली आहेत, त्यापैकी एक मतपत्रिका रद्द करण्यात येणार आहे़ ज्यांनी मतपत्रिका मिळाली नसल्याचे अर्ज केले आहेत, त्यांना टपालाने पाठविलेल्या व परत आलेल्या मतपत्रिका यांची छाननी करून दुबार मतपत्रिका शुक्रवारी सायंकाळपर्यंत देण्यात येणार आहे़ टपालाद्वारे मतपत्रिका मागविण्याची पद्धत या निवडणुकीत असल्याने त्यात यापूर्वी अनेक गोंधळ व आरोप-प्रत्यारोप होत आले आहेत़ त्याला आळा घालण्याचा प्रयत्न आम्ही यंदा केला असून, त्याला बऱ्याच प्रमाणात यश आले असल्याचे अ‍ॅड़ सुभाष किवडे यांनी सांगितले़ मतपत्रिका गठ्ठ्याने घेणाऱ्यांंकडून मतदारांचे नाव, त्यांचा क्रमांक तसेच ते घेऊन येणाऱ्यांचे नाव व संपर्क क्रमांक घेण्यात येत आहे़ त्यामुळे कोणी मतदारांच्या परस्पर मतपत्रिका आणून दिली, तर ती कोणी दिली ते समजणार असल्याचे परदेशी म्हणाले.(प्रतिनिधी)