शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राजीनाम्यावरून राजकारण

By admin | Updated: February 11, 2016 03:15 IST

उपमहापौर आबा बागुल यांच्या राजीनाम्यावरून काँग्रेसच्या शहर शाखेत आता राजकारण सुरू झाले आहे. ‘आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महत्त्वाच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये

पुणे : उपमहापौर आबा बागुल यांच्या राजीनाम्यावरून काँग्रेसच्या शहर शाखेत आता राजकारण सुरू झाले आहे. ‘आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महत्त्वाच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये बदल व्हावेत,’ असे मत प्रदेशाध्यक्षांसमोर मांडले असल्याचे त्यांच्याकडेच राजीनामा सुपूर्त केलेल्या आबा बागुल यांनी आज सांगितले, तर शहराध्यक्ष अभय छाजेड ‘बागूल यांनी राजीनामा दिला’ याशिवाय दुसरे काहीही बोलायला तयार नव्हते.प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे बागुल यांनी दिलेला राजीनामा आजच महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्याकडे काँग्रेसकडून देण्यात येणार होता; मात्र बागुल आज पालिकेत आलेच नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचा राजीनामा देता येत नसल्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची अडचण झाली. महापौरांनी बागुल यांना विचारणा केली असता त्यांनी आपण ‘मुंबईत’ असल्याचे सांगितले. त्यामुळे छाजेड व त्यांच्यासमवेत असलेले पालिकेतील काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी ‘बागुल यांनी राजीनामा दिला आहे’ एवढेच सांगितले. दरम्यान, आपल्या राजीनाम्याची पक्षाच्या याच दोन पदाधिकाऱ्यांना इतकी घाई का, असा सवाल बागुल यांनी उपस्थित केला आहे. सत्तेत सहभागी करून घेतेलेले असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेसने पदांच्या वाटपात काँग्रेसला फसवले आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)यंदा अखेरच्या वर्षी सावध राहणे गरजेचे आहे. या वर्षात स्थायी समितीचे अध्यक्षपद, किमान १० प्रभाग समित्यांची अध्यक्षपदे, शहर सुधारणा समितीचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्याची हमी राष्ट्रवादीकडून घ्यावी, असे बागुल यांचे म्हणणे आहे. प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा देताना आपण ही भूमिका मांडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपमहापौरांबरोबर गटनेते, शहराध्यक्ष पदांमध्येही बदल केला तर नव्यांना संधी मिळेल, असे मतही चव्हाण यांच्याकडे व्यक्त केले असल्याचे बागुल म्हणाले.