शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण्यांना खुर्चीची काळजी : दत्तात्रय शेकटकर : ‘जय जवान, जय किसान’ पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 12:33 IST

देशभक्तीला राष्ट्रशक्तीचे कवच असावे लागते आणि राष्ट्रशक्तीला देशभक्तीचे अंत:करण असावे लागते, असे मत निवृत्त मेजर जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘संवाद कलाकारांचा, संवेदना शेतकऱ्यांची’ या संमेलनाच्या समारोपदेशाला जवान आणि शेतकरी तारून नेऊ शकतात : पी. डी. पाटील

पुणे : राजकारण्यांना देशाची नव्हे, तर खुर्चीची काळजी असते. त्यामुळे देशावर येणाऱ्या संकटांपेक्षा, शत्रूच्या हल्ल्यापेक्षा उद्या आपली खुर्ची वाचणार का, हा प्रश्न त्यांना भेडसावत असतो. देशभक्तीला राष्ट्रशक्तीचे कवच असावे लागते आणि राष्ट्रशक्तीला देशभक्तीचे अंत:करण असावे लागते, असे मत निवृत्त मेजर जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी व्यक्त केले.संवाद, पुणे आणि डॉ. डी. वाय. पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संवाद कलाकारांचा, संवेदना शेतकऱ्यांची’ या संमेलनाच्या समारोपप्रसंगी निवृत्त मेजर जनरल दत्तात्रय शेकटकर यांना ‘जय जवान, जय किसान’ पुरस्कार, तर बारामती येथील स्वाती शिंगाडे यांना कृषिकन्या पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिग्दर्शक भाऊराव खराडे यांचा या वेळी विशेष सन्मान करण्यात आला. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील आणि श्यामची आई फाउंडशेनचे अध्यक्ष भारत देसडला यांच्या हस्ते गौैरवण्यात आले. या वेळी सचिन इटकर, सुनील महाजन, निकिता मोघे आदी उपस्थित होते.शेकटकर म्हणाले, ‘एकोणिसावे शतक सत्तेचे तर विसावे शतक पैैशांचे होते. एकविसावे शतक बुद्धिमत्तेचे आहे. ज्याच्याकडे बुद्धिमत्ता असेल, तो देशावर राज्य करेल. जग भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. त्यामुळे ‘जय जवान, जय किसान’प्रमाणेच आता ‘जय ज्ञान, जय विज्ञान’चा नारा द्यावा लागेल. ‘बळी तो कान पिळी’ या न्यायाप्रमाणे क्षमता वाढली की योग्यता वाढते. क्षमता आणि योग्यता वाढली की इरादे बुलंद होतात. भविष्यात पाकिस्तानला अमेरिकेचा त्रास भोगावा लागणार आहे. दहशतवादी जन्माला येत नाहीत, ते तयार केले जातात. भविष्यात मुलांवर योग्य संस्कार झाल्यासच या पिढीला चांगले वळण लागेल. घरातील स्त्री सुरक्षित असेल तर राष्ट्रही सुरक्षित राहील.’संतोष चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले.

पी. डी. पाटील म्हणाले, ‘देशाला जवान आणि शेतकरी तारून नेऊ शकतात. त्यांच्या अफाट कार्याची दखल आपण घ्यायला हवी. त्यांचे आयुष्य खूप खडतर असते. बरेचदा सैैन्याला जनतेच्या विरोधात उभे राहावे लागते. अशा वेळी, त्यांना होणारा त्रास शब्दांत सांगणे अशक्य आहे. समाजाने त्यांचा आदर केला पाहिजे.’भारत कृषिप्रधान देश असून येथे शेतीला दुय्यम स्थान दिले जाते. शेतकरी आत्महत्या करत राहिला तर कृषीच्या पदव्यांचा काय उपयोग? तळागाळातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान अवगत नसते. त्यामुळे सुशिक्षित पिढी शेतीकडे वळली पाहिजे. शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास आत्महत्या कमी होतील. शेतकरी जगला तर जग जगेल.

टॅग्स :d y patil universityडी. वाय. पाटील विद्यापीठPuneपुणे