शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

राजकीय इच्छुक केबलचालकांवर ‘करडी नजर’

By admin | Updated: October 23, 2016 03:53 IST

जिल्हा करमणूक कर विभागाच्या वतीने वारंवार नोटिसा देऊनदेखील अनेक केबलचालकांनी करमणूक कर भरण्यास टाळाटाळ करीत आहे. शहरामध्ये सध्या १५० केबलचालकांकडे

पुणे : जिल्हा करमणूक कर विभागाच्या वतीने वारंवार नोटिसा देऊनदेखील अनेक केबलचालकांनी करमणूक कर भरण्यास टाळाटाळ करीत आहे. शहरामध्ये सध्या १५० केबलचालकांकडे तब्बल १२ कोटी रुपयांची थकबाकी असून, यातील अनेक केबलचालक आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे सर्व थकबाकीदार केबलचालकांवर ‘करडी नजर’ ठेवली जाणार असून, सरकारी थकबाकी म्हणून सर्व केबलचालकांची नावे संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देण्यात येणार आहेत.याबाबत जिल्हा करमणूक कर अधिकारी सुषमा पाटील-चौधरी यांनी सांगितले, की जिल्ह्यातील सर्व केबलचालकांना पोस्टाचा परवाना घेणे बंधनकारक आहे, तसेच दर महिन्याला करमणूक करदेखील भरणे आवश्यक आहे. परंतु पुण्यातील डेन, मनोरंजन, इन केबल, आयसीसी, सीटी केबलसह तब्बल १५० केबलचालकांकडे आजही १२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये काही राजकीय वरदहस्त असलेल्या केबलचालकांनी तर करमणूक कर विभागाच्या नोटिसांना केराची टोपलीच दाखवली आहे. कराची वसुली करण्यासाठी यापूर्वी अनेक वेळा केबलचालकांचे कंट्रोल रूमदेखील सील करण्यात आले आहे. परंतु ही कारवाई करूनदेखील अनेकांनी कर भरण्यास टाळाटाळ केली. करमणूक कर विभागातर्फे करण्यात येणाऱ्या कारवाईविरोधात काही केबलचालकांनी न्यायालय आणि थेट महसूलमंत्र्यांकडेदेखील गाऱ्हाणे मांडले. इच्छूकांना भरावी लागणार थकबाकीयेत्या फेबु्रवारी-मार्चमध्ये जिल्ह्यात जिल्हा परिषद व दोन्ही महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांसाठी थकबाकी असलेले काही केबलचालक इच्छुक आहेत. हीच वेळ लक्षात घेऊन करमणूक कर विभागाने सर्व थकबाकीदार केबलचालकांची यादी संबंधित सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संविधानातील ३२४ कलमानुसार स्थानिक स्वराज्य संस्था अथवा अन्य निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना आपल्याकडे कोणत्याही स्वरुपाची सरकारी थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. हीच गोष्ट लक्षात घेऊन करमणूक कर विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे पाटील यांनी सांगितले.