शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेटसक्तीवर रंगला राजकीय कलगीतुरा

By admin | Updated: February 7, 2016 04:02 IST

हेल्मेटसक्तीच्या निषेधार्थ आयोजिण्यात आलेल्या आंदोलनामध्ये हेल्मेटसक्तीच्या विषयापेक्षा राजकीय कलगीतुरा रंगल्याचे शनिवारी पाहायला मिळाले. शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक

पुणे : हेल्मेटसक्तीच्या निषेधार्थ आयोजिण्यात आलेल्या आंदोलनामध्ये हेल्मेटसक्तीच्या विषयापेक्षा राजकीय कलगीतुरा रंगल्याचे शनिवारी पाहायला मिळाले. शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण आणि आमदार मेधा कुलकर्णी यांच्यामध्ये चांगलाच वाद रंगला. शिवसेना हेल्मेट सक्तीच्या विषयावरून परिवहनमंत्री दिवाकर रावतेंचा राजीनामा मागणार का, असा प्रश्न कुलकर्णी यांनी उपस्थित केला, तर पुणेकरांनी भाजपाचे आठ आमदार निवडून देऊनही त्यांच्याकडून प्रश्नांची सोडवणूक होत नाही. त्यामुळे पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी निम्हण यांनी केली. निम्हण यांच्या वक्तव्याला आमदार कुलकर्णी यांनीही सडेतोड उत्तर देत शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचे त्या म्हणाल्या. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या या निर्णयाविरोधात शिवसेना त्यांचा राजीनामा मागणार का? पुणेकरांना न्यायालयात जाण्याचा सल्ला रावतेंनी दिला. पुणेकरांच्या वतीने ते लोकप्रतिनिधी म्हणून न्यायालयात बाजू मांडणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजपावर आगपाखड करण्याऐवजी शिवसेनेच्या मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी रावतेंना घेराव घालावा, असे त्या या वेळी म्हणाल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी शासनाच्या काळात झालेल्या सक्तीला सर्वपक्षीय आमदारांनी विरोध केला होता. विधानसभेमध्ये याबाबत आवाज उठवत ही सक्ती रद्द करण्यात आली. मात्र पुणेकरांनी निवडून दिलेले आठही आमदार पुणेकरांचा प्रश्न विधानसभेत मांडत नाही. नैतिक जबाबदारीचे भान ठेवून पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असे विनायक निम्हण या वेळी म्हणाले.