पिंपरी : आमच्याकडे सर्वच प्रभागांत सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे युती किंवा आघाडी न झाल्यास स्वबळावर निवडणूक लढवू, असा दावा भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या राजकीय पक्षांनी केला होता. जागांच्या मुद्यांवरून युतीत आणि आघाडीत बिघाडी झाली. त्यामुळे सर्वजण स्वबळावर लढणार आहे. मात्र, एकाही राजकीय पक्षांकडे महापालिका क्षेत्रातील ३२ प्रभागांत १२८ उमेदवार मिळालेले नाहीत. त्यामुळे नेत्यांचा दावा फोल ठरला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार आहे. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी आम्ही सर्वच उमेदवार देण्यास समर्थ आहोत, असा दावा केला होता. जागांच्या फॉर्म्युला आणि चर्चा समाधानकारकपणे न झाल्याने आघाडी व युतीत बिघाडीमुळे सर्वजणांनी स्वबळावर लढण्याची भाषा केली. बंडखोरी होऊ नये आणि पळवापळवी होण्याच्या दृष्टीने उमेदवारी माघारीच्या दिवसापर्यंत निर्णय झालेला नाही. अर्जांच्या छाननीमुळे शहरातील एकही पक्ष १२८ पात्र उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकले नाही.जागांच्या मुद्यांवरून युतीत आणि आघाडीत बिघाडी झाली. त्यामुळे सर्वजण स्वबळावर लढणार आहे, असा दावा करणाऱ्या भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेला एकाही राजकीय पक्षाकडे महापालिका क्षेत्रातील ३२ प्रभागांत १२८ उमेदवार मिळालेले नाहीत. (प्रतिनिधी)
राजकीय पक्ष असमर्थ
By admin | Updated: February 10, 2017 03:15 IST