शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

शहरात राजकीय हालचाली वेगात

By admin | Updated: June 13, 2015 04:42 IST

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शहरपातळीवरील पक्ष संघटनात्मक बदल केले आहेत. शहराध्यक्षपदी संजोग वाघेरे यांची निवड झाल्यानंतर युवक अध्यक्ष आणि विद्यार्थी संघटना अध्य

राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शहरपातळीवरील पक्ष संघटनात्मक बदल केले आहेत. शहराध्यक्षपदी संजोग वाघेरे यांची निवड झाल्यानंतर युवक अध्यक्ष आणि विद्यार्थी संघटना अध्यक्ष, विविध सेल, प्रभागाध्यक्षांची निवड कधी होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडी लवकर कराव्यात, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे होऊ लागली आहे.लोकसभा आणि निवडणुकांनंतर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. निवडणुकीत आलेल्या अपयशाबद्दलची जबाबदारी स्वीकारून शहराध्यक्ष योगेश बहल, युवक अध्यक्ष मयूर कलाटे यांनी राजीनामा दिला होता. मात्र, पक्षश्रेष्ठींनी तो स्वीकारला नव्हता. राज्यपातळीवर संघटनात्मक बदलांचे निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्यानंतर महिनाभरापासून नवीन निवड कधी होणार, याबाबत उत्सुकता होती. पहिल्या टप्प्यात जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या निवडी झाल्या आहेत. शहराध्यक्षपदी वाघेरे यांची निवड झाली आहे. त्यामुळे आता नवीन अध्यक्ष युवक, प्रभाग अध्यक्ष, विविध सेलच्या निवडी कधी करणार? याबाबत कार्यकर्त्यांत उत्सुकता आहे. युवक अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास सध्या तरी कोणीही धजावत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहराध्यक्षांना पक्षीय जबाबदारी देताना, तसेच निवडी करताना खूप विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे. महापालिका निवडणुकीकडे लक्षमहापालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७ला होणार असल्याने महापालिकेतील सत्ता कायम ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शहरात गांभीर्याने लक्ष दिले असून, पदवाटपात प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी देण्यास सुरुवात केली आहे. पक्षाचे काम करणाऱ्या निष्ठावंतांनाच संधी द्यावी, बंडखोरांना संधी देऊ नये, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. - विश्वास मोरेकार्यकर्त्यांमधील मरगळ झटकण्याचे प्रयत्न सुरूकाँग्रेस पिंपरी : गटातटाचे राजकारण सुरू असतानाच शहर काँगे्रस कार्यकारिणीत बदल झाले. नेतृत्वात बदल घडून आला. शहराध्यक्षपदाच्या नेतृत्वात बदल झाल्यानंतर सुरुवातीला थोडी अंतर्गत धुसफूस सुरू झाली. नंतर मात्र ती थंडावली. संघटनात्मक बळकटीच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या. युवा कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यात आले. नव्या नेतृत्वाकडून मरगळ झटकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न सुरू असले, तरी गटातटात दुभंगलेल्या शहर काँग्रेसची स्थिती ‘जैसे थे’ आहे.अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये काम करणारे ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्यावर पक्षाने शिस्तभंगाची कारवाई केली. सचिन साठे यांची शहराध्यक्षपदी वर्णी लावली. महापालिकेतील विरोधी पक्षनेते विनोद नढे यांच्या पदालाही धक्का पोहोचविण्याचे प्रयत्न झाले. कैलास कदम यांचे नाव गटनेतेपदासाठी तसेच विरोधी पक्षनेतेपदासाठी पुढे आले. त्यामुळे भोईरसमर्थक आणि शहराध्यक्ष साठे यांच्यातील गटातटाचे मतभेद वाढत गेले. गटनेतेपदाचा वाद न्यायालयापर्यंत गेला. विभागीय आयुक्तांनी दिलेले पत्र प्राप्त होताच काँग्रेस आणि संलग्न अपक्ष नगरसेवक यांचे पद धोक्यात येऊ शकते, याची जाणीव झाल्याने दोन्ही गटांनी एकेक पाऊल मागे घेतले. समझोता हाच पर्याय पुढे आला. आपापसातील वाद विसरून २०१७ ची महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करणे हितकारक ठरू शकते, हे लक्षात घेऊन भोईर आणि साठे गटांत दिलजमाई झाली, तरच संघटन मजबूत होईल, या दृष्टीने वरिष्ठ पातळीवरून पक्षश्रेष्ठींनीच पुढाकार घेतला. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी माजी मंत्री रमेश बागवे यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक घेतली. रितसर तोडगा काढल्यास भोईर, साठे यांच्यात समझोता होईल. हे काँग्रेस संघटनाच्या दृष्टीने पोषक ठरणारे आहे. नव्या जोमाने मोट बांधण्याचा प्रयत्न झाल्यास काँग्रेसला तग धरणे शक्य होईल. - संजय मानेशहरातील कार्यकर्त्यांना लागले महामंडळाचे डोहाळेभाजपपिंपरी : भारतीय जनता पक्षाची नवीन प्रदेश कार्यकारिणी गुरुवारी जाहीर झाली. यामध्ये शहरातील एकाचेही नाव आले नाही. शहराध्यक्षपदाची मुदतही संपत आली असून, लवकरच नवीन अध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे. मात्र, यासाठीही अद्याप नाव चर्चेत नाही. या दोन्ही पदांऐवजी एखादे महामंडळ मिळावे, याचे डोहाळे पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना लागले आहेत. नऊ ते दहा पदाधिकारी महामंडळासाठी तयारीत आहेत. यामुळे शहर भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तयारीत आहेत. सध्या शहर कार्यकारिणीत शहराध्यक्षांसह अठरा उपाध्यक्ष, एक कार्याध्यक्ष, सहा सरचिटणीस आहेत. तर, सात ते आठ जण प्रदेश स्तरावर काम करणारे पदाधिकारी आहेत. यामुळे शहराध्यक्षपदाची मुदत काही दिवसांत संपणार असतानाही यात बऱ्याच पदाधिकाऱ्यांना रस नसल्याचे बोलले जाते. तसेच, गुरुवारी जाहीर झालेल्या नवीन प्रदेश कार्यकारिणीतही शहरातील पदाधिकाऱ्यांची वर्णी लागली नाही. इतर एखादे पद घेतल्यास महामंडळावर संधी मिळणार नाही, यामुळे शहराध्यक्षपद नको की प्रदेश कार्यकारिणीही नको, अशी शहरातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची स्थिती झाली आहे. महामंडळ मिळावे यासाठी शहरातील महत्त्वाचे पदाधिकारी तयारीत असून, त्यानुसार ‘फिल्डिंग’ही लावली आहे. महापालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे, तर भाजपाचे बोटावर मोजण्याइतपतच नगरसेवक आहेत. यामुळे अनेक वर्षांपासून शहरातील कार्यकर्त्यांना कोणतीही महत्त्वाची पदे उपभोगण्याची संधी मिळालेली नाही. अशातच सध्याच्या ‘मोदी लाटे’मुळे कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. पक्षाच्या छोट्या पदांची जबाबदारी सांभाळत शहरात पक्ष टिकून ठेवला. हेच वर्षानुवर्षे पक्षाचे काम करणारे कार्यकर्ते आता मोठ्या पदाची अपेक्षा बाळगून आहेत. त्यामुळे महामंडळाकडे अनेकांचे लक्ष आहे. - मंगेश पांडे