शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

प्रारूप प्रभागरचनेत राजकीय हस्तक्षेप?

By admin | Updated: September 8, 2016 01:25 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकाविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस या प्रमुख पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावण्यास सुरुवात केली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकाविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस या प्रमुख पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावण्यास सुरुवात केली आहे. प्रारूप प्रभागरचनेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांनी हस्तक्षेप केला असून, सोईस्करपणे रचना करून घेतल्याची चर्चा शहरात रंगली आहे.महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकमुखी सत्ता आहे. ही सत्ता अबाधित ठेवण्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेससमोर आहे. तर केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार असल्याने महापालिकेवर झेंडा फडकाविण्याचा मनसुबा भारतीय जनता पक्षाने रचला आहे. त्यामुळे भाजपाने राष्ट्रवादीवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. गैरव्यवहाराची एकामागून एक प्रकरणे उकरून काढण्यास सुरुवात केली आहे. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरीच्या राजकारणात लक्ष घातले आहे. संघनीतीचा वापर करून भाजपाने व्यूहरचनाही केली आहे. महापालिका निवडणुकीचा पहिला टप्पा प्रारूप प्रभागरचनेचा आहे. राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने या वर्षी गुगल अर्थचा वापर करून प्रभागाची रचना करावी, असे आदेश दिले आहेत. नद्या, प्रमुख रस्ते, रेल्वेलाईन, वसाहती, सोसायट्या न तोडता रचना करावी, असे स्पष्ट आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. या वर्षीची निवडणूक ही चार सदस्यीय प्रभागानुसार होणार असल्याने प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा तयार करून आयुक्तांनी हा आराखडा जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना आज सादर केला. प्रभागरचनेचा आराखडा सादर होण्यापूर्वीच राष्ट्रवादी आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपले प्रभाग सोईस्करपणे तोडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरले आहे. गेल्या आठवडाभरात निवडणूक विभागात विविध पक्षांचे नगरसेवक, पदाधिकारी यांच्या फेऱ्या वाढल्याचे दिसून आले. निवडणूक आयोगाला प्रारूप आराखडा सादर होण्यापूर्वीच भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हस्तक्षेप केला असून, प्रभाग सोईस्करपणे तोडून राजकीय हित जोपासल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)