शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

केंदूर-पाबळ गटात राजकीय समीकरणांना वेग

By admin | Updated: January 22, 2017 04:36 IST

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या राजकीय समीकरणांनी वेग घेतला असून, आंबेगावला जोडलेला केंदूर-पाबळ जिल्हा परिषद गट, कान्हूर मेसाई, रांजणगाव

शिक्रापूर : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या राजकीय समीकरणांनी वेग घेतला असून, आंबेगावला जोडलेला केंदूर-पाबळ जिल्हा परिषद गट, कान्हूर मेसाई, रांजणगाव व टाकळी हाजी गटात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस, भाजपा, सेना, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे यांचे तिकीट मिळविण्यासाठी इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली असून, पक्षांतर्गत बंडाळी रोखण्यासाठी पक्षश्रेष्ठींची कसरत या तिन्ही गटांत पाहावयास मिळत आहे. मागील निवडणुकीत या तिन्ही गटांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. तर, पंचायत समितीत केंदूर पंचायत समिती भाजपाने ताब्यात घेतली होती. राजकीय डावपेचांत सध्या शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी या तिन्ही गटांत आपल्या पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरवण्यासाठी कंबर कसली आहे. या प्रमुख पक्षांबरोबरच भाजपाचे विद्यमान आमदार बाबूराव पाचर्णे यांनी भाजपाच्या उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून, जिल्हा स्तरावरून काँग्रेसने या तिन्ही गटांत आपले उमेदवार उतरवण्याची जय्यत तयारी केली आहे. या भागात मनसेचे वर्चस्व कमी असले, तरी उमेदवार उभे करण्यासाठी पक्षपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पंजा, घड्याळ, कमळ, धनुष्यबाण, रेल्वे इंजिन तर काही अपक्ष चिन्हांवर उमेदवारी मिळवून निवडणूक लढवताना ऐन वेळी राजकीय कोलांटउड्या या गटांत दिसण्याची शक्यता आहे. पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींच्या मनधरणीबरोबरच गट व गणातील कार्यकर्त्यांना जवळ घेऊन दबावतंत्राचा वापर करून कुठल्याही परिस्थितीत पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांचा कस लागणार असून, भाजपा-सेना व काँग्रेस-राष्ट्रवादी यांची युती झाली नाही, तर या तिन्ही गटांत अत्यंत चुरशीच्या लढती पाहायला मिळतील. (वार्ताहर)ग्रामीण भागात वाढली हायटेक प्रचार यंत्रणागेल्या १५ वर्षांत जि.प., पंचायत समिती निवडणूक प्रचारात आमूलाग्र बदल झाला असून, भोंगागाडी, पत्रके याचबरोबर भिंतीवरील जाहिरातींनी बदल केला असून, सोशल मीडियावर इच्छुकांनी भर देत व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकच्या माध्यमातून व वृत्तपत्रातील जाहिरातीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रचार यंत्रणा राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यातच मोबाईल मेसेज व व्हॉईस रेकॉर्ड मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.