शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडानिकेतनविषयी धोरण ठरवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 02:56 IST

प्रशासनाची ग्वाही : सर्वसाधारण सभेत नगरसेवकाची टीका

पुणे : ‘गवंडी किंवा आचाऱ्याकडे काम करणाºया महिलांनाही दरमहा किमान १५ हजार रुपये वेतन असते. बालकांना चांगल्या सवयी लावून शिक्षण देणाºया महिलांना मात्र दरमहा ८ हजार रुपयांवर काम करावे लागत आहे. प्रशासनाला याची काही खंत वाटते किंवा नाही,’ असा सवाल विचारत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. बालवाडी सेविकांबरोबरच क्रीडानिकेतनला क्रीडाशिक्षकच नाहीत, शिक्षण समितीही नियुक्त केली जात नाही अशा अनेक विषयांवरून प्रशासनावर टीका करण्यात आली. अखेरीस या सर्व गोष्टींचे धोरण ठरवून ते सर्वसाधारण सभेत सादर करण्याचे आश्वासन प्रशासनाने सदस्यांना दिले.

विशाल तांबे यांनी हा विषय उपस्थित केला. अनेक बालवाडी सेविका आता निवृत्त होत आल्या तरीही त्यांच्या वेतनाबाबत निर्णय होत नाही ही खेदाची बाब आहे, असे ते म्हणाले. त्यांच्याकडून बालवाडीमधील मुलांना शिकवण्याशिवाय राष्ट्रीय म्हणून अनेक कामे करून घेतली जातात, त्यांच्या वेतनाचा विषय आल्यावर मात्र दुर्लक्ष केले जाते, असे तांबे म्हणाले. राजश्री शिळीमकर, अश्विनी कदम यांनीही या विषयावर प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा व या महिलांना वेतनवाढ करावी, रिक्त जागा आहे त्यावर नियुक्ती करावी, अशी मागणी केली. आनंद रिठे यांनी मुलांच्या भोजनाच्या खर्चाबाबत तो कमी असल्याची टीका केली.४रघू गौडा यांनी, शाळा आहेत; मात्र मुलांना खेळण्यासाठी मैदानेच नाहीत, असे स्पष्ट केले. शंकर पवार यांनी क्रीडाशिक्षकच नाहीत हे लाजिरवाणे असल्याचे सांगितले. प्रवीण चोरबेले आदींनीही या चर्चेत सहभाग घेतला. सरकारने, न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही शिक्षण समिती स्थापन होत नसल्याबद्दल काही सदस्यांनी टीका केली. महापौर मुक्ता टिळक यांनी प्रशासनाने यावर खुलासा करावा, असा आदेश दिला. अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली यांनी या सर्वच विषयांबाबत धोरण ठरवून ते सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर या विषयावरची चर्चा थांबली.