शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचे होर्डिंग्ज धोरण अधांतरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:35 IST

छायाचित्रांच्या फ्लेक्सने सुजलेले रस्ते पाहून कंटाळलेल्या पुणेकरांना ही गोष्ट आणखी बराच काळ सहन करावी लागणार आहे.

पुणे : प्रेरणास्थान, श्रद्धास्थान, वाढदिवसाच्या शुभेच्छा अशा नावांनी व भल्यामोठ्या छायाचित्रांच्या फ्लेक्सने सुजलेले रस्ते पाहून कंटाळलेल्या पुणेकरांना ही गोष्ट आणखी बराच काळ सहन करावी लागणार आहे. शहराच्या सौंदर्याची हानी करणाºया या होर्डिंग्जबाबत धोरण ठरवण्याचा विषय महापालिका अधिकारी व पदाधिकाºयांनी लोकानुनय महत्त्वाचा ठरवत सोमवारी पुन्हा पुढे ढकलला. आयुक्तांनी या विषयावर सविस्तर टिप्पणी सादर करावी, असे कारण त्यासाठी देण्यात आले. महापालिकेत सोमवारी झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीत हा विषय टाळण्यात आला.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र भलेमोठे फ्लेक्स लागण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच मंगळवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी साजरी होत असल्यामुळे त्याही फलकांनी शहराचे सगळे चौक, रस्त्यांच्या कडेच्या बाजू, मोकळ्या जागा, इमारतींच्या भिंती, याप्रमाणे दिसेल जागा तिथे फ्लेक्स लावण्यात येत आहेत. संपूर्ण शहरात सगळीकडे सध्या हेच फ्लेक्स दिसत आहेत. यामुळे शहराच्या सौंदर्याची हानी तर होत आहेच, शिवाय वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन त्यामधून अपघातही होत आहेत.जाहिरातींच्या फलकांसाठी महापालिकेकडून शुल्क आकारण्यात येत असते. विनापरवानगी असे फलक लावले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. हे शुल्कही विशिष्ट कालावधीकरिता असते. ती मुदत संपली की लगेचच संबंधित संस्थेला फलक काढावा लागतो. नाही काढला तर दंड केला जातो. महापालिकेत खास या कामासाठी म्हणून आकाशचिन्ह विभाग आहे. त्यांच्याकडे शहरातील फलकांसाठी परवानगी देणे, दंड करणे, शुल्क आकारणी करणे या कामांची जबाबदारी आहे. शहरातील मोक्याच्या जागांची पाहणी करणे, मुदत संपलेले फलक शोधणे यासाठी त्यांचे कर्मचारी शहरात सातत्याने फिरत असतात. नोंदणीकृत जाहिरात फलकांची यादीच त्यांच्याकडे असते. काही कोटी रुपये वर्षाला महापालिकेला यातून नियमित उत्पन्न मिळते, लिलावाच्या माध्यमातून हे जाहिरात फलक दिले जातात.नेमके याच्याउलट स्थिती शुभेच्छादर्शक फलकांची आहे. ते हवे तिथे, हवे त्याप्रमाणे कुठेही, कोणाकडूनही लावले जातात. त्यासाठी कसलीही परवानगी काढली जात नाही. शुल्क देण्याचा तर प्रश्नच नाही. जाहिरात फलकांनी मोक्याच्या जागा अडवल्यामुळे असे फुकट फलक कुठेही लावण्यात येतात.>प्रशासनावर फोडले जातेय खापर : विषय राजकारण्यांच्या अडचणींचागेल्या काही वर्षांत फ्लेक्स प्रिंटिंग करून देण्याचे दर स्पर्धेमुळे स्वस्त झाले आहेत. त्यामुळेच अगदी साध्या साध्या कारणांसाठीही असे फ्लेक्स लावणाºयांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळेच याबाबत काही धोरण ठरवण्यात यावे, असा विषय गेले अनेक महिने प्रशासनाकडून महापालिकेत येतो आहे, मात्र पक्षनेत्यांच्या बैठकीच्या पुढे काही तो सरकायला तयार नाही. याचे कारणच तो राजकारण्यांच्या अडचणीचा आहे, हे आहे.असे फुकट फलक लावणारे बहुतेक जण हा राजकीय पक्षांच्या नेत्यांचे कार्यकर्तेच आहेत. नगरसेवक, आमदार, खासदार यांचे पाठीराखे असलेल्या या कार्यकर्त्यांना प्रशासन हात लावत नाही. फ्लेक्सबाबत काही निश्चित धोरण ठरवले तर त्याची अंमलबजावणी आपल्याच कार्यकर्त्यांना अडचणीची ठरेल, हे लक्षात घेऊन सातत्याने हा विषय पुढे ढकलण्यात येत आहे. सोमवारी झालेल्या बैठकीतही तो प्रशासनाकडून अपुरी माहिती मिळाली, असे कारण देत तो पुढे नेण्यात आला.पदाधिकाºयांच्या या भूमिकेमुळे प्रशासन त्रस्त झाले आहे. नागरिकांकडून फार ओरड होऊ लागली, की प्रशासनाच्या वतीने नावापुरती मोहीम काढली जाते. या मोहिमेतही पुढाºयांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या फलकांना हात लावला जात नाही.वाढदिवस किंवा शुभेच्छा देण्याचे निमित्त संपल्यानंतरही कित्येक दिवस हे फलक तसेच पडून असतात.