शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्ब आढळल्याने खळबळ, पोलीस पथकाने घेतला ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:51 IST

कोंढवा खुर्द येथील पालिका विकसित करत असलेल्या उद्यानामध्ये गुरुवारी दुपारी हँड ग्रेनेड सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पुणे : कोंढवा खुर्द येथील पालिका विकसित करत असलेल्या उद्यानामध्ये गुरुवारी दुपारी हँड ग्रेनेड सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विकसित होत असलेल्या या उद्यानाजवळ मोठमोठ्या सोसायट्या असल्याने या बॉम्बमुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उंड्री-एनआयबीएम रस्त्यावर कोणार्क इंद्रायू सोसायटीजवळ असलेल्या उद्यानात ही घटना घडली आहे. उभा सोसायटीच्या अमेनिटी स्पेसवर पालिकेतर्फे नवीन उद्यान विकसित केले जात आहे. या ठिकाणी त्याबाबतचे ठिकठिकाणी माती टाकण्याचे काम काही कामगार नेहमी प्रमाणे करीत होते.बुधवारी सायंकाळी परवीन शेख या त्यांच्या मुलांना उद्यानात फिरण्यासाठी घेऊन आल्या होत्या. त्यांच्या मुलांना हा बॉम्ब झाडावर ठेवलेला दिसला. त्यांच्या मुलांनी ही घटना घरी गेल्यावर त्यांना सांगितली. सुरुवातीला त्यांनी याकडे दुर्लक्ष केले, परंतु जेव्हा मुलांनी त्यांना त्यावर वस्तूवर काहीतरी लिहिले आहे, असे सांगितले तेव्हा त्यांनी नगरसेविका नंदा लोणकर यांना याबाबत कल्पना दिली. नगरसेवक नंदा लोणकर यांनी याबाबत कोंढवा पोलिसांना कळविले. कोंढवा पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाला पाचारण केले व त्यांनी हा बॉम्ब ताब्यात घेतला. उद्यान व परिसरात अजून काही बॉम्ब आहेत की नाही याची खात्री बॉम्ब शोधक पथकाने श्वानाच्या मदतीने केली, परंतु त्यांना काही आढळले नाही. हा जिवंत बॉम्ब असल्याचे कळत आहे, नागरिकांच्या जागरूकतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली आहे.