पिंपरी : विविध गुन्हे दाखल असलेल्या दत्तात्रय लोणकर या सराईत गुंडाला पकडण्यासाठी पोलिसांनी पाठलाग केला. काळेवाडीतील कृष्णवाटिका इमारतीत आलेल्या या गुंडास पोलीस आल्याची कुणकुण लागली. त्याने खिडकीतून पोलीस येत असल्याचे पाहिले, पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरून उडी टाकली. त्यात पायाचे हाड मोडले. विविध पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल असलेला गुंड लोणकर काळेवाडीतील एका इमारतीत आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. भोसरी एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर व त्यांचे सहकारी त्याच्या मागावर होते. त्यांनी काळेवाडीत तो ज्या ठिकाणी आहे, तेथे पाठलाग सुरू केला. पोलीस पाठलाग करत पहिल्या मजल्यावर आले, तोपर्यंत तो दुसऱ्या मजल्यावर गेला. तेथून त्याने उडी मारली. पायाला दुखापत झाली.(प्रतिनिधी)
पोलिसांना चकवा बेतला पायावर
By admin | Updated: November 5, 2015 02:06 IST