शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
3
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
4
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
5
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
6
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
7
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
9
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
10
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
11
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
12
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
13
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
14
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
15
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
16
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
17
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
18
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
19
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
20
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा

पोलिसांचे ‘वरातीमागून घोडे’, दंड ‘कॅशलेस’ घेण्याची उपरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : संचारबंदीचा भंग केल्याबद्दल सध्या शहरात रस्त्यारस्त्यांवर नागरिकांची अडवणूक होतेय. महत्त्वाचे कारण असले तरी पोलीस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : संचारबंदीचा भंग केल्याबद्दल सध्या शहरात रस्त्यारस्त्यांवर नागरिकांची अडवणूक होतेय. महत्त्वाचे कारण असले तरी पोलीस सोडत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. दंडाची पावती फाडण्यास पोलीस भाग पाडतात. रोख पैसे नसतील तर तेथेच असलेल्या ‘पोलीस मित्रा’च्या वैयक्तिक खात्यात ‘गुगल पे’ करायला सांगतात. त्यामुळे आपल्याला पावती मिळाली, तरी हा पैसा स्थानिक पोलिसांच्या खिशात जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कानावरही या तक्रारी आल्याने आता पुणे पोलीस ‘गुगल पे’ व अन्य अ‍ॅपद्वारे होणाऱ्या व्यवहारासाठी स्वतंत्र बँक खाते उघडणार आहेत.

शहरात सुमारे ९६ ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. येथे वाहनांची तपासणी होते. महत्त्वाचे काम असले तरी पोलिस अडवतात. जबरदस्तीने पाचशे रुपयांची पावती करायला सांगतात. पैसे नसतील तर खासगी व्यक्तीला ‘गुगल पे’ करायला लावतात. ‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी अगदी योग्य कारण असले, तरी पावत्या फाडल्या जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांनी सांगितले, “अशा अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. संबंधितांना पावती दिली जात असेल, तर त्याच्या पैशांचा भरणा पोलिसांच्या खात्यात करावा लागतो. ही तेथील त्या वेळची ॲडजेस्टमेंट असेल. त्याला भ्रष्टाचार म्हणता येणार नाही. पण तरीही ती अनियमितता आहे.”

या तक्रारींची दखल घेऊन अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवी व्यवस्था तयार करण्यात येत आहे. त्यानुसार भांडारकर रस्त्यावरील खासगी बँकेत स्वतंत्र खाते उघडण्यात येणार आहे. पुणे पोलीस दलातील सर्व ३२ पोलीस ठाण्यांच्या नावाने स्वतंत्र कोड असणार आहे. त्यामुळे कोणत्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत किती दंड वसूल करण्यात आला. त्याची माहिती प्रत्येक दिवशी सायंकाळी समजू शकेल. त्यामुळे लोकांकडून वसूल होणारी दंडाची रक्कम खासगी व्यक्तीच्या खात्यावर जाणार नाही.

चौकट

वाहतूक शाखेत ज्याप्रमाणे सर्व प्रकारच्या दंडात्मक कारवाईसाठी ‘कॅशलेस’ व्यवस्था आहे. तशीच व्यवस्था ‘कोरोना’ दंडवसुलीसाठी करण्यात येणार आहे. येत्या २ ते ३ दिवसांत ही योजना आकाराला येईल.-

डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त

चौकट

चौकट

लॉकडाऊनमध्ये ‘वसुली’?

“आईचा अपघात झाल्याने रविवारी नांदेड सिटीतून कासारवाडीला निघालो. कारमध्ये मी व पत्नी दोघेच होतो. राजाराम पुलाच्या कोपऱ्यावर पोलिसांनी अडविले. खूप सांगितले तरी ते ऐकायला तयार नव्हते. पुरावा मागत होते. आता नुकताच अपघात झाल्याचे समजल्यानंतर पुरावा कोठून आणणार? २ हजार रुपये दंड मागितला. गयावया केली तेव्हा ३०० रुपये घेतले. पावती न देताच घरी परत जायला सांगितले. ही कसली अडवणूक, लॉकडाऊनचा आधार घेत कसली वसुली सुरू आहे?”

-विजय शेंडगे, नागरिक

चौकट

३ जूनची कारवाई

दंडात्मक कारवाई - १ हजार ७७१

दंड वसुली - ८ लाख ६५ हजार ८०० रुपये