शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
2
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
3
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
4
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
5
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
6
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
7
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
8
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
9
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
10
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
11
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
12
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
13
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
14
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
15
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
16
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
17
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
18
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
19
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
20
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर

पोलीस मित्रांची आग विझविण्यासाठी झाली मोठी मदत

By admin | Updated: December 17, 2015 02:21 IST

कोथरुडमधील डाव्या भुसारी कॉलनीमधील गाद्यांच्या कारखान्याला तसेच मयुरेश डायनिंग हॉलला लागलेल्या आगीमध्ये चार निष्पाप कामगारांचा बळी गेला, तर दोन जण गंभीर जखमी झाले.

पुणे : कोथरुडमधील डाव्या भुसारी कॉलनीमधील गाद्यांच्या कारखान्याला तसेच मयुरेश डायनिंग हॉलला लागलेल्या आगीमध्ये चार निष्पाप कामगारांचा बळी गेला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. या आगीमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यामध्ये अग्निशमन दल व पोलिसांना ‘पोलीस मित्रांची’ मोठी मदत झाली. कोथरुड पोलीस ठाण्यासोबत काम करणाऱ्या २५ पोलीसमित्रांचा गट तातडीने घटनास्थळी दाखल झाला. तसेच त्यांनी तातडीने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मेसेज फॉरवर्ड करून आणखी मदत मागवली. पोलीसमित्र मयूर नेवासे यांनी सांगितले, की जेव्हा आगीची माहिती मिळाली तेव्हा आम्ही तातडीने भुसारी कॉलनीमध्ये पोहोचलो. तेथे पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करीत होते. नागरिकांना तसेच बघ्यांची गर्दी नियंत्रित करण्याचे मोठे आव्हान होते. त्यामुळे आम्ही तातडीने पौड रस्ता, घटनास्थळाकडे येणाऱ्या रस्त्यांवर स्वयंसेवक नियुक्त केले. लक्ष्मण धुती यांनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यावर वेड्यावाकड्या पद्धतीने लावण्यात आलेल्या वाहनांमुळे रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि पोलिसांची वाहने जायला अडचण निर्माण होत होती. त्यामुळे कार्यकर्त्यांनीच वाहतूक पोलिसांची भूमिका बजावत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. आमचे सर्व स्वयंसेवक व पोलीसमित्र रस्त्यांवर उभे राहून वाहतूक नियमन करीत होते. तसेच आपत्कालीन मदतीसाठी वाहनांना वाट मोकळी करून देत होते. मात्र काही नागरिक घटनेचे फोटो आणि व्हिडीओ काढून ते व्हॉट्सअ‍ॅप टाकण्यासाठी धडपडत होते, असे धुती म्हणाले. पोलीस हवालदार बी. एच. चव्हाण हे कोथरुड पोलीस ठाण्याच्या पोलीसमित्रांचे समन्वयक म्हणून काम करतात. या सर्व पोलीसमित्रांनी मोठी मदत केली असून त्यामुळे बचावकार्य सुरळीत झाले. पोलिसांना त्यांनी गर्दी नियंत्रण आणि वाहतूक नियमन करून सहकार्य केले. हातातील सर्व कामे सोडून पोलीसमित्र मदतीला धावल्याचे चव्हाण यांनी सांगितले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच नागरी वस्तीला धोकामयुरेश डायनिंंग हॉलच्या बेकायदेशीर वापराबाबत पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला वारंवार तक्रारी केल्यानंतरही राजकीय वरदहस्तामुळे या व्यावसायिकावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या व्यावसायिकांकडे असलेल्या सिलिंडरच्या टाक्याही यामध्ये सापडल्यामुळेही आग विझविण्यास विलंब झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.पौड रस्त्यावर वाहनांच्या रांगाभुसारी कॉलनीतील गादीच्या गोडावूनला लागलेल्या आगीमुळे मुख्य बाह्यवळण महामार्गाबरोबरच नळस्टॉप ते चांदणी चौकापर्यंतच्या रस्त्यावर वाहतूककोंडीचा ताण आला होता, तर कोथरूड डेपो परिसरात लागलेल्या वाहनांच्या रांगांमुळे बचावकार्यालाही विलंब लागला. कोथरूड वाहतूक पोलिसांनी केलेल्या प्रयत्नामुळे दोन तासांत वाहतूक पूर्वपदावर आली.