शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘बीएचआर’ घोटाळ्यात पोलिसांनी गोळा केले ट्रकभर पुरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) या पतसंस्थेत अवसायक जितेंद्र कंडारे व त्याच्या साथीदारांनी केलेल्या गैरव्यवहाराचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) या पतसंस्थेत अवसायक जितेंद्र कंडारे व त्याच्या साथीदारांनी केलेल्या गैरव्यवहाराचे पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल एक ट्रक भरुन पुरावे गोळा केले आहेत. त्यात प्रामुख्याने जळगावमधील वेगवेगळ्या १२ ठिकाणी टाकलेल्या छाप्यात मिळालेली कागदपत्रे, शपथपत्रे, तसेच लॅपटॉप, पीसीओसह मोठ्या प्रमाणावर डिजिटल साहित्यही हस्तगत करण्यात आले आहे. याबरोबरच औरंगाबाद व अन्य ठिकाणी केलेल्या तपासणीत अनेक महत्वपूर्ण कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत.

‘बीएचआर’ संबंधित कारवाईसाठी पुणे पोलिसांनी संपूर्ण गुप्तता पाळली होती. या प्रकरणी डेक्कन, पिंपरी आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडे ३ गुन्हे दाखल आहेत. दोन पोलीस उपायुक्त, ४ सहायक पोलीस आयुक्त, २५ पोलीस निरीक्षक, २५ सहायक निरीक्षक आणि १०० पोलीस कर्मचारी असा पुणे, पिपंरी आणि ग्रामीण पोलिसांच्या या मोठ्या पथकाने जळगावमध्ये मागच्या शुक्रवारी सकाळीच जाऊन छापा घातला होता. त्यात जळगावमधील १२ ठिकाणी एकाचवेळी हे छापे घालण्यात आले. त्यातून मिळालेल्या माहितीवरुन इतर ठिकाणी तसेच औरंगाबाद येथे झडत्या घेण्यात आला.

सुमारे एक ट्रक भरुन मिळालेल्या या कागदपत्रांची छाननी सध्या सुरु आहे. त्यामध्ये ठेवीदारांच्या पावत्या, कर्जदारांचे शपथपत्रे, अनेक बनावट शिक्के असे साहित्य आहे. त्यातील कोणते बँकेने केलेली दस्तऐवज आहेत व कोणते आरोपींनी बेकायदेशीरपणे लोकांकडून करुन घेतलेली कागदपत्रे आहेत, ही कागदपत्रे लिलावामधील आहेत की तारण म्हणून घेतलेली आहेत, याची तपासणी सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी पुणे पोलिसांनी स्वतंत्र पथक तयार केले आहे. तसेच अटक केलेल्या आरोपीचे जबाब नोंदवून घेण्याचे कारण स्वतंत्र पथक करीत आहेत.

चौकट

ठेवीदारांकडून पुणे पोलिसांचे स्वागत

पुणे पोलिसांच्या कारवाईचे बीएचआरचे ठेवीदार, गुंतवणुकदार, ग्राहक यांच्याकडून जोरदार स्वागत केले जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही न्यायासाठी प्रयत्न करीत आहोत. पोलिसांच्या कारवाईने आम्हाला न्याय मिळण्याची आशा वाटू लागल्याचे ठेवीदार म्हणू लागले आहेत. ‘बीएचआर’शी संबंधित अनेक जण आर्थिक गुन्हे शाखेत येऊन पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत करीत आहेत.