शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

माथेफिरूच्या धमकीने पोलीस यंत्रणा वेठीस

By admin | Updated: January 24, 2016 02:14 IST

बॉम्बद्वारे पुणे रेल्वे स्थानक उडवून देणाच्या एका माथेफिरूच्या धमकीच्या फोनने शनिवारी पहाटे शहर पोलीस व रेल्वे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. तसेच भुवनेश्वर-मुंबई या विमानातही

पुणे : बॉम्बद्वारे पुणे रेल्वे स्थानक उडवून देणाच्या एका माथेफिरूच्या धमकीच्या फोनने शनिवारी पहाटे शहर पोलीस व रेल्वे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. तसेच भुवनेश्वर-मुंबई या विमानातही बॉम्ब ठेवल्याचे त्याने सांगितल्यानंतर हे विमानही नागपूरमध्येच उतरविण्यात आले. मात्र, बॉम्बशोधक पथकाने दोन्ही ठिकाणी कसून तपास केल्यानंतर काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. पोलिसांनी धमकीचा फोन आल्यानंतर त्याला साडेतीन तासांतच पाटस येथून अटक केली. त्याची मानसिकता ठीक नसल्याने त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.संजयकुमार मिश्रा (वय ३५, रा. धायरी, पुणे, मूळ रा. भुवनेश्वर, ओरिसा) असे या माथेफिरूचे नाव आहे. धायरीमध्ये तो तीन वर्षांपासून राहत आहे. तिथे तो ‘साई अ‍ॅनिमेशन स्टुडिओ' या नावाने अ‍ॅनिमेशनचा व्यवसाय करतो. शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास त्याने पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुणे रेल्वे स्थानक उडवून देण्याच्या धमकीचा फोन केला. ही माहिती रेल्वे पोलिसांना कळविण्यात आली. त्यानंतर लगेचच बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस), श्वान पथक, शीघ्र कृती दल आदी पथकासह रेल्वे स्थानकावर धाव घेतली. दहशतवाद विरोधी पथकाने समांतर तपास सुरू केला. सकाळी सहापर्यंत संपूर्ण रेल्वे स्थानकाची कसून तपासणी करण्यात आली. मात्र, काहीही आक्षेपार्ह आढळले नाही.दरम्यान, पोलिसांनी फोन करणाऱ्याची माहिती मिळविली असता तो धायरीत राहत असल्याचे समजले. पोलिस त्याठिकाणी गेले असता घर बंद होते. मिश्रा याने हा फोन केल्याचे स्पष्ट झाले. तो सोलापूर रस्त्याने कारने भुवनेश्वरकडे जात असल्याची माहिती मिळाली. दौंड पोलिसांनी त्याला त्याला सकाळी सहाच्या सुमारास पाटस येथे ताब्यात घेतले. त्याने भुवनेश्वर-मुंबई विमानात बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. भुवनेश्वर येथून या विमानाने त्यावेळी उड्डाण केलेले असल्याने पोलिसांनी तातडीने संबंधितांना कळविले. सकाळी सव्वा नऊच्या सुमारास हे विमान नागपूर येथे उतरविले. यंत्रणांनी विमानाची तपासणी केल्यानंतर काहीही आढळले नाही. नंतर विमानाला हिरवा कंदील दाखविण्यात आला. यामुळे प्रवाशांना मनस्ताप झाला.