शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियंत्रणावर पोलिसांचा भर

By admin | Updated: July 8, 2016 03:59 IST

वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमनाचेच काम करावे, गर्दीच्या वेळी दंड, पावत्या करण्याऐवजी वाहतूक सुरळीत कशी राहील, याकडे लक्ष द्यावे, वॉर्डनने वाहने अडवू नये, कामकाजात कसलाही हस्तक्षेप

पिंपरी : वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमनाचेच काम करावे, गर्दीच्या वेळी दंड, पावत्या करण्याऐवजी वाहतूक सुरळीत कशी राहील, याकडे लक्ष द्यावे, वॉर्डनने वाहने अडवू नये, कामकाजात कसलाही हस्तक्षेप करू नये, वाहने अडविणे अथवा दंड करणे आदी कामे केवळ पोलीस कर्मचाऱ्यानेच करावीत, अशा स्पष्ट सूचना वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त राजेंद्र भामरे यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाहनांची संख्या वाढली असून, अपघातांची संख्याही वाढत आहे. तर शहरातील चौकांमध्ये वाहतूक नियमनासाठी नेमण्यात आलेले वाहतूक पोलीस वाहतूक नियमनाऐवजी गप्पा मारत बसतात. तर काही पोलीस दंडाच्या पावत्या न फाडता दंडाची आकारणी करीत असल्याची वस्तुस्थिती ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून समोर आणली. या वृत्ताची शहरात जोरदार चर्चा झाली. दरम्यान, या स्टिंग आॅपरेशनची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत कर्मचाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत. याबाबत राजेंद्र भामरे म्हणाले की, अपघात रोखण्यासाठी वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यावर भर दिला जात आहे. शहरातील मुख्य चौकांसह ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक केली जात आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांकडून केवळ वाहतूक नियमनालाच प्राधान्य दिले जावे, याबाबतही सूचना दिल्या आहेत. रस्त्याने जाताना वाहनचालकाला कुठलाही त्रास होऊ नये, याची खबरदारी घ्यावी. ट्रॅफिक वॉर्डनला केवळ सहायक म्हणून नेमण्यात आले आहे. त्यांनी वाहन अडवू नये, अथवा दंडाची मागणी करू नये, याबाबत सर्व वाहतूक विभागांना कळविण्यात आले आहे. असे गैरप्रकार घडल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे भामरे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)वाहतूक पोलिसांनी सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी कारवाईऐवजी वाहतूक नियमनाकडे लक्ष द्यावे. कुणीही एकत्रित उभे न राहू नये. वॉर्डनने वाहने अडवू नये, वाहने अडविणे अथवा दंड ही कामे पोलीस कर्मचाऱ्यानेच करावीत. वाहनचालक कमी वेळेत इच्छित स्थळी पोहोचावा, वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, या सूचना देण्यात आल्या आहेत. - राजेंद्र भामरे, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग