शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मांजरीमुळे पोलिसांच्या घरात भांडण

By admin | Updated: December 14, 2015 00:06 IST

दोन पोलीस निरीक्षक शेजारी शेजारी रहायला...एकाच्या दाराला लावलेली असते दुधाची पिशवी...आगाऊ मांजर ही पिशवी फाडते...फाटलेल्या पिशवीमधून दूध दुस-या पोलीस निरीक्षकाच्या दारात वाहात जाते

पुणे : दोन पोलीस निरीक्षक शेजारी शेजारी रहायला...एकाच्या दाराला लावलेली असते दुधाची पिशवी...आगाऊ मांजर ही पिशवी फाडते...फाटलेल्या पिशवीमधून दूध दुस-या पोलीस निरीक्षकाच्या दारात वाहात जाते...हे दुध कोणी पुसायचे यावरुन वाद पेटतो...तावातावात पोलीस निरीक्षक महाशय भांडायला सुरुवात करतात...आपला पतीही पोलीस निरीक्षकच असल्यामुळे शेजारीण बाईही भांडायला उठतात...एका मांजरीमुळे भडक लेले हे भांडणे पोचते पोलीस ठाण्यात...दोन निरीक्षकांच्या घरात लागलेले भांडण मिटवण्यासाठी काय ‘फॉर्म्युला’ वापरावा या विचारात पोलीस ठाण्याचे निरीक्षक पडतात...गोंधळा गोंधळात शेवटी दाखल होतो अदखलपात्र गुन्हा.परंतु आपण दुध सांडलेले नसल्यामुळे आपापल्या दारापुढचे दुध आपापले पुसून घ्यावे असा पवित्रा या महिलेने घेतला. त्यावरुन या दोन्ही निरीक्षकांच्या बायकांमध्ये जुंपली. शाब्दिक ‘चकमक ’ उडाली. नागपुरच्या निरीक्षकाच्या पत्नीने रागाने दार आपटून बंद केले. एरवी हातामधील बळ वापरणा-या पुणे ग्रामीणच्या निरीक्षकाने आपल्या पायातील बळ त्या दारावर आजमावायला सुरुवात केली. दाराला लाथा घालत शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली. नागपुरच्या निरीक्षकाच्या पत्नीने शेवटी पोलिसांकडेच दाद मागायचे ठरवत औंध पोलीस चौकी गाठली. शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद त्यांनी दिली. दोन निरीक्षकांच्या घरातील भांडणे तिस-या पोलीस निरीक्षकाच्या पोलीस ठाण्यात आल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. दोघांमध्ये ‘समेट’ घडवण्याचे सर्व प्रयत्न थकल्यावर शेवटी पुणे ग्रामीणच्या निरीक्षक महोदयांविरुद्ध चतुशृंगी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यावर या प्रकरणावर पडदा पडला. (प्रतिनिधी)