शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

भूत उतरविणाऱ्या मांत्रिकासह तीन महिलांना पोलीस कोठडी

By admin | Updated: March 15, 2016 03:52 IST

भूत उतरविण्याच्या बहाण्याने मारहाण करून महिलेचा छळ केल्याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात मांत्रिकासह तीन महिला आरोपींविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला.

पिंपरी : भूत उतरविण्याच्या बहाण्याने मारहाण करून महिलेचा छळ केल्याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात मांत्रिकासह तीन महिला आरोपींविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला. मांत्रिकासह त्याला साथ देणाऱ्या तीन महिलांना देहूरोड पोलिसांनी घटना घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अटक केली. न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोनी उमेश जेगरे (वय २६, रा. शिवाजीनगर, देहूरोड) या महिलेने मांत्रिकासह तीन आरोपी महिलांविरुद्ध रविवारी फिर्याद दाखल केली. दुसऱ्याच दिवशी सोमवारी देहूरोड पोलिसांनी आरोपींना शिताफीने पकडले. भीमप्पा शंकरप्पा कुंचीकर या मांत्रिकासह त्याला साथ देणाऱ्या नंदा खुडे (वय ५१), संगीता धनराज शिंदे (वय ४१), मीना प्रशांत कदम (वय ५५) या तीन महिलांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांना वडगाव मावळ येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले. अंधश्रद्धा बाळगून भूत उतरविण्यासाठी महिलेला मारहाण करणारे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. देहूरोड परिसरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर झोपडपट्टीतील मरिमाता मंदिरात तीन महिलांच्या मदतीने मांत्रिकाने सोनी जेगरे या महिलेला मारहाण केली. तिला भुताने झपाटले आहे, असे सांगून भूत उतरविण्यासाठी तिचे केस ओढले. डोळ्यांत, कानात, नाकात हळद-कुंकू लावलेले लिंबू पिळले. या अघोरी कृत्याविरोधात त्या महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आरोपींविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील काही बिल्डरांनी दौंड, कुरकुंभ येथे मांत्रिकाच्या मदतीने पैशांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला. त्या बिल्डरांना गुंगीचे औषध पाजून मांत्रिकाने शिष्यासह पलायन केले. १० मार्चला घडलेल्या या घटनेनंतर १४ मार्चला देहूरोडमध्ये घडलेल्या मांत्रिकाच्या मदतीने भूत उतरविण्याच्या या घटनेने या भागातील नागरिकांवर अद्यापही अंधश्रद्धेचा पगडा असल्याचे निदर्शनास आले आहे. (प्रतिनिधी)अंधश्रद्धेचे वाढते प्रकारशहर परिसरामध्ये बुवाबाजीचे प्रमाण वाढले आहे. यात अनेक लोकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. तर याला अशिक्षित नागरिकांबरोबर सुशिक्षित नागरिकही बळी पडत आहेत. फसवणूक झाल्याचे लक्षात येऊनही संबंधित बुवांच्या विरोधात कोणतीही तक्रार देण्यासाठी नागरिक पुढे येत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांत वाढच होत आहे. या घटना रोखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन पोलिसांत तक्रारी दाखल करणे गरजेचे आहे.