शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

‘डीएसकें’च्या पत्नीकडून पोलिसांना जुजबी माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 04:45 IST

बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याकडे पुणे पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी चौकशीला सुरुवात केली़

पुणे : बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याकडे पुणे पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी चौकशीला सुरुवात केली़ या चौकशीत त्यांनी पोलिसांना आवश्यक असलेली महत्त्वाची माहिती न देता केवळ जुजबी माहिती पुरविली़डी़ एस़ कुलकर्णी यांना त्रास झाल्याने रविवारी प्रथम ससून रुग्णालयात व त्यानंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडी देण्याची न्यायालयाला विनंती केली होती़ त्याचवेळी त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांची पोलीस कोठडी कायम आहे़ पोलिसांनी सोमवारी त्यांच्याकडे विविध माहिती विचारली़ मात्र, त्यावर त्यांनी जुजबी माहिती दिली़डी. एस. कुलकर्णी यांनी केलेल्या व्यवहारांचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष लेखापरीक्षकांची नेमणूक केली होती़ त्यांचा फॉरेन्सिक आॅडिट रिपोर्ट पोलिसांना मिळाला आहे. त्यानुसार डीएसकेंनी नावात छोटे बदल करून एकूण ५९ कंपन्या स्थापन केल्या व त्याद्वारे लोकांकडून ठेवी स्वीकारल्याचे दिसून येत आहे़याशिवाय त्यांनी अनेकांकडून सुमारे ३५ कोटी रुपयांची वैयक्तिक कर्जेदेखील घेतली आहेत़ ठेवी व असुरक्षित कर्जे मिळून एकूण १ हजार १५३ कोटी रुपये त्यांनी स्वीकारले आहेत़याशिवाय विविध बँकांची २ हजार ८९२ कोटींची कर्जे आहेत़ याशिवाय ज्या लोकांनी फ्लॅट बुक केले़ त्यांनी भरलेले पैसे व घेतलेली कर्जे यांची रक्कम वेगळी आहे़न्यायालयाने डी़ एस़ कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांनाही चौकशीसाठी पोलिसांकडे ४ दिवस हजेरी देण्यास सांगितले आहे़ त्यांनीही पोलिसांना तपासात सहकार्य केले नाही़ शिरीष कुलकर्णी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर २२ फेब्रुवारीला अंतिम सुनावणी होणार आहे़