नारायणगाव : अनैतिक संबंधाला अडसर ठरेल म्हणून महिलेच्या पतीच्या डोक्यात कुºहाड घालून खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांच्या पोलीस कोठडीत २६ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र्र पोळ यांनी दिली. मुकादम संजय बबन आहेर ( रा. आळे, ता. जुन्नर) यांचा खून केल्याप्रकरणी मारुती रामदास दातीर, त्यांचा भाचा महेश सोपान मिसाळ, मेहुणा सोपान विठ्ठल मिसाळ (रा. डावखरवाडी, आळे, ता. जुन्नर, मूळ रा. राहुरी, जिल्हा अहमदनगर) या तिघांना नारायणगाव पोलिसांनी दि. १९ मे रोजी अटक केली होती. गुन्ह्यातील चौथा आरोपी बाजीराव दातीर अद्याप फरार आहे. या संदर्भात देवेंद्र पोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयच्या पत्नीचे अनैतिक संबंध मारुती दातीर याच्याबरोबर होते. या संबंधाची कुणकुण संजयला होती. तो आपल्या पत्नीला त्या कारणावरून मारहाण करीत असे. संजय आपल्या पे्रयसीला मारहाण करतो. भविष्यात आपल्या अनैतिक संबंधाला तो विरोध करील किंवा आपल्याला जीवे मारील म्हणून मारुतीने संजयला दि. १५ रोजी आळे गावच्या हद्दीतील ज्ञानेश्वर मंदिराजवळ आणून त्याच्या मानेवर कुºहाडीने वार करून त्याला जीवे मारले होते. या खून प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी वरील तिघांना अटक केली होती. या तिघांना जुन्नर न्यायालयात हजर केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत २६ मे पर्र्यंत वाढ करण्यात आली. (वार्ताहर)
खून करणार्या तिघांना पोलीस कोठडी
By admin | Updated: May 24, 2014 05:09 IST