शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चोरी करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी

By admin | Updated: July 17, 2017 04:19 IST

खिडकीची जाळी उचकटून दुकानातील ८५ हजारांचा ऐवज चोरी केल्याप्रकरणी दोघांना लष्कर पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयाने

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : खिडकीची जाळी उचकटून दुकानातील ८५ हजारांचा ऐवज चोरी केल्याप्रकरणी दोघांना लष्कर पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयाने १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश रविवारी दिला. त्यांच्या ताब्यातून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तौसीफ ऊर्फ बाबाजी बशीर शेख (वय १९), अमोल किसन अवचरे (वय १९, दोघेही रा. काशेवाडी) अशी कोठडी सुनावलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी सज्जू किशनचंद नानवाणी (वय ६३, रा. साळुंखे विहार रोड) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १७ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. फिर्यादीचे लष्कर परिसरातील एमजी रस्त्यावर कापडाचे दुकान आहे. घटनेच्या दिवशी आरोपींनी दुकानाच्या मागच्या बाजूच्या खिडकीची लोखंडी जाळी उचकटून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील सुमारे ५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल व ८० हजार ८०० रुपयांची रोकड असा एकूण ८५ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरी केला. याप्रकरणी त्यांविरोधात भारतीय दंड विधान कलम ४५४, ४५७, ३८०, ३४ प्रमाणे लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वीही आरोपींना चोरीच्या विविध दोन गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांचे अन्य कोणी साथीदार आहेत का, तसेच त्यांनी आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचा तपास करायचा असल्याने सहायक सरकारी वकिलांनी त्यांना पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाला केली. न्यायालायने ती मान्य करत १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.