शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस वसाहतींबाबत कोलदांडा

By admin | Updated: July 22, 2016 01:01 IST

नगरसेवकांनी दिलेल्या प्रस्तावावर संदिग्ध अभिप्राय देऊन पालिका प्रशासनाने राज्य सरकारवर जबाबदारी ढकलली आहे.

पुणे : शहरातील पोलीस वसाहतींच्या सुधारणेसाठी नगरसेवकांनी दिलेल्या प्रस्तावावर संदिग्ध अभिप्राय देऊन पालिका प्रशासनाने राज्य सरकारवर जबाबदारी ढकलली आहे. कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या पोलिसांच्या ‘घर हवे आहे, घर’ या आर्त हाकेकडे ना पालिका लक्ष द्यायला तयार आहे, ना सरकार! झोपडीत राहणाऱ्यांना चांगल्या इमारतींमधील सदनिका मिळाल्या; पोलिसांना मात्र ५० वर्षांपूर्वीच्या पडझडीला आलेल्या इमारतीमधील दोन खोल्यांमध्येच कुटुंब सांभाळावे लागत आहे. शहरात एकूण १३ पोलीस वसाहती आहेत. साधारण ४० ते ५० वर्षांपूर्वी त्या बांधलेल्या आहेत. त्यातील काही वसाहती तर त्यापेक्षाही जुन्या कौलारू बैठ्या घरांच्या आहेत. इमारतींमध्ये दोन लहान खोल्या, तर कौलारू वसाहतींमध्येही तशाच दोन खोल्या व पुढेमागे थोडी मोकळी जागा, असे या वसाहतींचे स्वरूप आहे. या इमारतींमध्ये मिळून साधारण ३ हजार खोल्या आहेत. सर्व इमारती व कौलारू घरेही पडायला आली आहेत. त्यांची कसली डागडुजी नाही व रंगरंगोटीही नाही. वसाहतींची अशी अवस्था पाहून नगरसेवक संजय बालगुडे व प्रकाश ढोरे यांनी पालिकेच्या शहर सुधारणा समितीकडे एक प्रस्ताव दिला.या वसाहती पाडून त्या जागेवर नव्या आधुनिक इमारती बांधण्याचे सुचविले आहे. त्यासाठी या इमारतींना ३ चटई क्षेत्र मंजूर करावे, असे म्हटले आहे. तसे केले तर झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून बांधण्यात आल्या तशा चांगल्या सदनिका असलेल्या इमारती बांधणे शक्य आहे.समितीने हा प्रस्ताव नियमाप्रमाणे पालिका प्रशासनाकडे अभिप्रायासाठी म्हणून पाठविला. प्रशासनाने अत्यंत संदिग्ध स्वरूपात त्याला उत्तर दिले आहे. विकास नियंत्रण नियमावलीत असेल तर अशी मंजुरी देता येईल; मात्र राज्य सरकारच्या त्रिसदस्यीय समितीने सरकारने नवी विकास नियंत्रण नियमावली दिली आहे, ती अद्याप मंजूर झालेली नाही, असे प्रशासनाने म्हटले आहे.पालिका प्रशासनाने स्पष्ट शब्दांत अभिप्राय दिला असता, तर तो सर्वसाधारण सभेच्या मंजुरीने राज्य सरकारकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करता आला असता. शहराचा विकास आराखडा वेळेवर मंजूर न करणारे सरकार या गोष्टीसाठी कधी वेळ देणार, असे बालगुडे व ढोरे यांचे म्हणणे आहे. वसाहतींच्या जागा राज्य सरकारच्या आहेत. त्यांची देखभाल-दुरुस्ती करण्याची जबाबदारी सरकारच्याच सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे. मात्र, मंत्र्यांसाठीची विश्रांतिगृहे चकचकीत ठेवण्याकडेच त्यांचे लक्ष असते. कितीही तक्रारी केल्या, मागण्या केल्या तरीही बांधकाम खात्याकडून वसाहतींच्या सुधारणेकडे कधीही लक्ष दिले जात नाही, असा पोलीस कर्मचाऱ्यांचा अनुभव आहे. बाहेर खासगी जागेत राहणे किंवा स्वत:चा फ्लॅट घेणे पोलिसांना परवडत नाही. जुन्या इमारती पाडून नव्या बांधाव्यात, हाच त्यावरचा पर्याय आहे, त्यासाठी सरकारकडे तसा प्रस्ताव पालिकेसारख्या संस्थेने पाठविणे गरजेचे होते.मात्र, प्रशासनाने विनाकारण त्यात खोडा घातला, अशी टीका बालगुडे यांनी केली आहे.>झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांना झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिरणामुळे आधुनिक इमारतीत चांगली घरे मिळाली. बँकेतील कर्मचारी, अधिकारी, शाळा-महाविद्यालयांमधील शिक्षकही आमच्यापेक्षा चांगल्या घरांमध्ये राहतात. सरकार मग आम्हालाच का अशा लहान जागेमध्ये ठेवत आहे? - संजय रसाळ, पोलीस कर्मचारी