पुणे : चॅप्टर केसमध्ये अटक करु नये, यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना ओतूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बजरंग राणूसिंग बाडीवाले (वय ४९) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सापळा रचून पकडले़ तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांचे विरुद्ध ओतून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़ दाखल असलेल्या गुन्ह्यावरुन तक्रारदार व त्यांचे नातेवाईकांवर चॅप्टर केस करण्यात आली आहे़ यात अटक करु नये, यासाठी पोलीस उपनिरीक्षक बाडीवाले यांनी १० हजार रुपयांची लाच मागितली़ तक्रारदाराच्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ओतूर येथे सापळा रचला़ तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच घेताना बाडीवाले यांना पकडण्यात आली़
पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना पकडले
By admin | Updated: January 26, 2017 00:05 IST