शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस असल्याची बतावणी करून लुटणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:08 IST

पुणे : पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकाला मारहाण करून लुटणाऱ्या दोघा तोतया पोलिसांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. मुब्बसिर ...

पुणे : पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकाला मारहाण करून लुटणाऱ्या दोघा तोतया पोलिसांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली.

मुब्बसिर हिदयतुल्ला राठविलकर (वय ३६, रा. लेकस्वार सोसायटी, दत्तनगर) आणि तौसिफ अहमद मोमीण (वय ३१, रा. नेपोव्हिल केप, कोंढवा बुद्रुक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही घटना खडी मशिन चौकाकडे जाणा-या रस्त्यावर शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. याप्रकरणी अजगर मोहम्मद युसूफ (वय ३१, रा. भिवंडी) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

अजगर युसूफ शनिवारी मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास कात्रज चौकाकडून खडी मशिन चौकाकडे गॅस शिगडी घेऊन जात होते. त्यावेळी कात्रज पुलाच्या पुढे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मुब्बसिर आणि तौसिफने यांना त्यांनी पत्ता विचारला. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडे पैसे मागितले. मात्र, अजगर यांनी आरोपींना पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्यामुळे आरोपींनी अजगर यांच्या मालकाला फोन लावून शिवीगाळ करीत पोलीस असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी ५ हजारांची मागणी केली. तसेच अजगर यांच्याकडून जबरदस्तीने पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे तपास करीत आहेत.