शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

५ लाखांची लाच मागणाऱ्या पोलीस उपविभागीय अधिकार्‍यासह तिघांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:11 IST

२ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जालना येथे अ‍ॅट्राॅसिटीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ५ लाख ...

२ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जालना येथे अ‍ॅट्राॅसिटीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी करून तडजोडीअंती ३ लाख रुपये ठरल्यानंतर त्यापैकी २ लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारला. तेव्हा पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून उपविभागीय पोलीस अधिकारी व दोन पोलीस कर्मचार्‍यांना जालना येथे पकडले़

उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर अशोक खिराडकर (वय ४५, रा. जालना) आणि पोलीस नाईक संतोष निरंजन अंभोरे (वय ४५, रा. कदीम पोलीस ठाणे, जालना) व पोलीस काॅन्स्टेबल विठ्ठल पुंजाराम खार्डे (नेमणूक एस. डी. ओ. जालना कार्यालय, रा. कडवंचीवाडी, ता. जि. जालना) अशी त्यांची नावे आहेत.

औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा कार्यभार पोलीस अधीक्षक राजेश बनसोड यांच्याकडे आहे. जालना येथील पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्याविरुद्ध अ‍ॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिराडकर याने संतोष अंभोरे व विठ्ठल खार्डे यांच्यामार्फत ५ लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार करण्यात आली. कारवाईची गुप्त राखण्यासाठी पुण्यातून पथक पाठविण्यात आले. पोलीस उपअधीक्षक वर्षाराणी पाटील, पोलीस निरीक्षक सुनील क्षीरसागर, पोलीस हवालदार नवनाथ वाळके, काॅन्स्टेबल किरण चिमटे, दिनेश माने यांचे पथक जालनाला पोहचले. त्यांनी १८ व १९ मे रोजी या तक्रारीची पडताळणी केली. त्यात तडजोडीअंती ३ लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार त्यातील पहिला हप्ता म्हणून २ लाख रुपये देण्यात येणार होते. पोलिसांनी तक्रारदार याच्या घरी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे पोलीस नाईक संतोष अंभोरे हा तक्रारदार यांच्या घरी आल्यावर २ लाख रुपये स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.

सापळा कारवाई यशस्वी होताच इतर दोघांना ताब्यात घेण्यात आले असून खिराडकर यांच्या घराची झडती घेण्याचे काम सुरू आहे.