उरुळी कांचन : कोर्टाच्या सुनावणीनंतर येरवडा कारागृहात नेत असताना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेल्या सचिन सदाशिव कांबळे (वय २८, रा. पंचशीलनगर, ता. फलटण, जि. सातारा) याला पकडण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश आले.कांबळे यास दौंड येथील न्यायालयातील सुनावणीनंतर येरवडा कारागृहात नेत होते. पोलिसांबरोबर झटापट करून तो फरार झाला. सोमवारी तो उरुळी कांचन परिसरात फिरत असल्याची माहिती खबऱ्यांमार्फत सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना मिळाली. त्यानुसार दराडे व त्यांचे सहकारी यांच्या मदतीने उरुळी कांचन परिसरात आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. आरोपीला येरवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिसांना तुरी देणारा अटकेत
By admin | Updated: November 15, 2016 03:38 IST