शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची कारवाई सुरू

By admin | Updated: November 22, 2014 00:12 IST

बारामती शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी सम, विषम पार्किंग व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे.

बारामती : बारामती शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी सम, विषम पार्किंग व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहरातील पथारी व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायासाठी ‘हॉकर्स झोन’ची अंमलबजावणी करण्यात येईल. दिवसभर नोकरीनिमित्त आलेल्या गाड्या एकाच जागेवर लावल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दुकान मालकांनी ठरवून दिलेल्या जागेवरच कर्मचाऱ्यांना गाड्या लावणे सक्तीचे करण्यात येणार आहे. बारामती शहरातील वाहतूक नियंत्रणाबाबत ‘लोकमत’ने ‘पदपथ बनले व्यवसाय पथ’ असे वृत्त प्रसिद्ध केले. त्याचबरोबर शहरात ठिकठिकाणी रस्त्यालगत केलेल्या पदपथांचा वापरच होत नसल्याचे निदर्शनास आणले. ठिकठिकाणी झालेल्या अतिक्रमणाच्या अनुषंगाने वाहतुकीला अडथळा होतो. त्यावर आजपासूनच बारामती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी स्वत: पोलीस व्हॅनमधून वाहतुकीला अडथळा करणाऱ्या गाड्यांवर स्पीकरद्वारे माहिती देऊन कारवाई सुरू केली. मुख्य बाजारपेठेत दुकानांमध्ये नोकरीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मालकांनी वाहनतळाची सोय केली आहे. याच अनुषंगाने आज तहसील कार्यालयाच्या सभागृहात वाहतूक नियंत्रणासाठी व्यापारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापार महासंघ, पथारी व्यावसायिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वाहतूक सुधारणांसाठी अनेकांनी सुचना मांडल्या. बैठकीला नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, नायब तहसीलदार तांबोळी आदी उपस्थित होते. तीन हत्ती चौक ते पेन्सिल चौक पर्यंत प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांच्या वेगांवर मर्यादा आणणे, त्याचबरोबर वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करणे आदी निर्णय घेण्यात आल्या आहेत.नगराध्यक्ष सुभाष सोमाणी यांनी सांगितले की, शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. अपघात टाळण्यासाठी दुभाजक तोडण्याची मागणी नगरसेवक सुनिल सस्ते यांनी केली. यावेळी किशोर सराफ, अ‍ॅड. नितिन भामे, नरेंद्र गुजराथी, अण्णा आटोळे, करण इंगुले, संतोष टाटीया, नवनाथ बल्लाळ, निलेश मोरे, आसिफ खान, जितेंद्र जाधव आदींनी सूचना मांडल्या. (प्रतिनिधी)