शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तहानेच्या अभावामुळे कविता झाली उथळ, नीलिमा गुंडी, अजय कांडर यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 01:41 IST

कविला सभोवतालचा भोवताल जाणून घ्यायची तहान असावी लागते. या तहानेचा अभाव असल्यामुळेच आजची कविता उथळ झाली आहे. फक्त टाळ्यांसाठी कविता लिहिणे चुकीचे आहे.

पुणे  - कवितेत लय येण्यासाठी कवीच्या जगण्यात लय यावी लागते. प्रतिकांचा आणि प्रतिमांचा शोध घ्यावा लागतो. वास्तवाचं आणि समाजाचं भान कविला असलंच पाहिजे. जगणं समृद्ध झालं तरच कविता प्रगल्भ होते. कविता आणि गीत वेगळे नसतात. कविला सभोवतालचा भोवताल जाणून घ्यायची तहान असावी लागते. या तहानेचा अभाव असल्यामुळेच आजची कविता उथळ झाली आहे. फक्त टाळ्यांसाठी कविता लिहिणे चुकीचे आहे. कवितांचा बाजार झालाय असे मत डॉ. नीलिमा गुंडी आणि अजय कांडर यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘एक कवी कवयित्री’ कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ कवी उद्धव कानडे आणि प्रमोद आडकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मसापच्या कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थति होत्या.कवितेच्या निर्मितीप्रक्रियेविषयी भूमिका मांडून कवींनी अनेक दर्जेदार कविता सादर करून प्रेक्षकांची उस्फुर्त दाद मिळवली. विचारलेल्या विविध प्रश्नांना दोन्ही कवींनी दिलेली समर्पक आणि चिंतनशील उत्तरांमुळे रसिक मंत्रमुग्ध झाले. गदिमा आणि खेबूडकर हे उत्तम कवीच आहेत. समीक्षकांना ते कवी का वाटत नाहीत? कविता जगण्याला चिकटून आली की ती कसदार होते. कवी व सामान्य माणूस वेगळा नसतो. मनाचा शोध कविला घ्यावा लागतो, कवितेत भेदभाव असू नयेत. कविता मंचावर जास्त आलीपाहिजे. याकडे नीलिमा गुंडी आणि अजय कांडर यांनी लक्ष वेधले.सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद आडकर यांनी आभार मानले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.माझा कवितेत ‘वेदनेचा पाऊस’नीलिमा गुंडी म्हणाल्या, ‘कविता लिहिताना माझ्यातला समीक्षककधी आडवा आला नाही. परंतू कविता एखाद्या मासिकाला पाठवताना माज्यातला समीक्षक जागा होत असे त्यामुळे त्या कवितेलासमीक्षेच्या अंगाने पाहूनच ती कविता पाठवत होते. माझ्या कवितेतला आशय निसर्ग आणि स्त्री हा आहे. त्यामुळे ‘पक्षी’, ‘आजचा हॅम्लेट’, ‘अंतर्नाद’, ‘हे ईश्वर’, ‘तळ्यात मळ्यात’, ‘ती’ या कवितांमधून मधून दिसून येतो.माझ्या कविता या काळानुसार बदलत आलेल्या आहे.कवीचं जगणं समृद्ध होत जाते तशी कविता समृद्ध होत जाते. सभोताली अनेक घडामोडी घडत असतात कवीने त्याकडे फक्तसूक्ष्मदृष्टीने पहिले पाहिजे. माज्या कवितांमध्ये समाजातील दु:ख आणि वेदना आलेल्या आहे. त्यामुळे माझा कविता ‘वेदनेचा पाऊस’, ‘तुझ्यासोबत’, ‘सर्वकालीन प्रार्थना’, ‘राष्ट्रवाद’, ‘हत्ती इलो’, ‘आवण ओल’ या मधून तो दिसून आहे. - अजय कांडर

टॅग्स :marathiमराठीnewsबातम्या