पुणो : आजच्या धकाधकीच्या युगात कोणाकडे कल्पना, त्यावर कविता करायला वेळ नाही. आपण सगळे स्वार्थी झालो आहोत. कविता करायला विसरलो आहोत. त्यामुळे कविता हरवत चालली आहे. अशा वेळेस शेक्सपिअरची कविता शोधाविशी वाटते, असे मत ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक सईद अख्तर मिङर यांनी व्यक्त केले.
निमित्त होते, पुणो इंटरनॅशनल सेंटर व राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आयोजित ब्रिटिश नाटककार-शेक्सपिअर यांच्या नाटकांवर आधारित ‘कालातीत शेक्सपिअर एक चित्रपट महोत्सवा’च्या उद्घाटन समारंभाचे. या वेळी अल्पना पंत शर्मा, प्रशांत गिलपनी, डॉ. लतिका पाडगावकर, प्रा. सुरेश छाब्रिया आदी उपस्थित होते. मिङर म्हणाले, ‘‘कलाकृती जीवन समृद्ध करते. नामदेव ढसाळ, नारायण सुव्रे यांच्या कविता खूप शक्तिशाली व सक्रिय आहेत.’’(प्रतिनिधी)