पुणो : पुणो महानगर परिवहन महामंडळाच्या दोन अधिका:यांची गुन्हे अन्वेषन विभाग (सीआयडी) द्वारे चौकशी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने महापालिका आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पीएमपीच्या गेल्या काही वर्षात करण्यात आलेल्या सुटय़ा भागांच्या खरेदीत मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची बाब समोर आली होती. त्यानुसार, मागील महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर रिपाइंचे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे व काँग्रेसचे नगरसेवक संजय बालगुडे यांनी सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रवीण आष्टेकर, मयुरा शिंदे, तसेच भांडारप्रमुख संतोष माने यांची सीआयडी चौकशी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. याबाबतची चौकशी करण्याचे अधिकार पालिकेस नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल्यानंतर हा प्रस्ताव महापालिका आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठविण्यात आला. (प्रतिनिधी)
..तर जनहित याचिका दाखल करणार
स्थायी समितीने अभिप्राय देण्य़ासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली असली, तरी पालिका आयुक्तांनी अभिप्राय सादर न केल्यास आम्ही थेट राज्यशासनाकडे चौकशीची मागणी करणार असल्याचे डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले. तसेच या भ्रष्टाचाराचे पुरावे आपल्याकडे असून पालिकेने दिरंगाई केल्यास आपण स्वत: उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पीएमपी ही स्वतंत्र संस्था राज्यशासनाच्या अधिकारात येते. अनुदान देत असलो तरी त्यांच्या चौकशीचे अधिकार पालिकेला नाहीत. तसेच प्रशासनास सीआयडी चौकशी करता येईल का, याबाबत महापालिका आयुक्तांना अभिप्राय सादर करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच आठ दिवसांच्या अभिप्राय देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
-बापूराव कर्णे गुरुजी, अध्यक्ष, स्थायी समिती, महानगरपालिका