पुणे : काही दिवसांपासून वाढलेल्या उन्हामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस मार्गावर बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच, अनेक चालक व वाहक लग्नाच्या धांदलीत अडकल्याने ‘पीएमपी’चाच बँड वाजताना दिसत आहे. सध्या नेहमीपेक्षा तुलनेने १५० ते २०० गाड्या दररोज बंद राहत आहेत. त्यामुळे पीएमपीचे उत्पन्नही घटले असून प्रवाशांना नियमित बस सोडण्यातही अडचणी येत आहेत.मागील चार ते साडेचार महिन्यांत पीएमपीच्या मार्गावरील बसचे प्रमाण सरासरी १,५०० पर्यंत पोहोचले आहे. डॉ. श्रीकर परदेशी यांनी अध्यक्षपदाचा भार स्वीकारल्या दिवशी म्हणजे दि. १४ डिसेंबर रोजी हे प्रमाण सुमारे १,२५० एवढे होते. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे टप्प्याटप्प्याने मार्गावरील बसचे प्रमाण वाढत गेले. तसेच, ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी करण्यातही त्यांना यश मिळाले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात डॉ. परदेशी यांची बदली झाल्यानंतरही दि. ३० एप्रिलला मार्गावरील बसचे प्रमाण १,५५० एवढे राहिले. मात्र, काही दिवसांपासून आगारातच बस उभ्या राहण्याचे, तसेच ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. पीएमपीच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील बससह एकूण २,१०५ बस आहेत. त्यांपैकी १,२०५ बस पीएमपीच्या मालकीच्या आहेत, तर ९४५ बस ठेकेदारांमार्फत चालविल्या जातात. शनिवारी सकाळच्या सत्रात एकूण १,५९२ बसचे शेड्यूल निश्चित करण्यात आले होते. त्यांपैकी केवळ १,३७१ बस मार्गावर आल्या. विविध तांत्रिक कारणांसह चालक व वाहक नसल्याने बस मार्गावर येऊ शकल्या नाहीत. दोन दिवसांपूर्वी तर केवळ १,३०७ बसच मार्गावर येऊ शकल्या. सध्या लग्नसराई सुरू असल्याने अनेक चालक व वाहक सुटीवर आहेत. तसेच, दररोज सुटीवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाणही जास्त आहे. पीएमपीप्रमाणेच ठेकेदारांकडील वाहकही सुटीवर असल्याने त्यांच्याही अनेक बस मार्गावर येऊ शकतनाहीत. त्याचप्रमाणे, सध्या उन्हाळ्यामुळे नेहमीपेक्षा ब्रेकडाऊनचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी, प्रत्यक्ष मार्गावर धावणाऱ्या बसची संख्या घटली आहे. त्यामुळे पीएमपीच्या उत्पन्नावरही परिणाम होऊ लागला आहे. आणखी काही दिवस हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)बस मार्गावर बंद पडण्याचे प्रमाण काही दिवसांपासून वाढले आहे. पीएमपीच्या अधिकाधिक बस मार्गावर आणण्याबाबत अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे उत्पन्नही कमी येऊ लागले असून, हीच स्थिती कायम राहिल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही कठीण जाईल.- विजय देशमुख, संचालक, पीएमपीदोन दिवसांतील मार्गावरील बसदिवसनियोजितप्रत्यक्ष मार्गावरभाडेतत्त्वारील बसशुक्रवार१६१२६७१६३६शनिवार१५९२६९५६७६
लग्नसराईमुळे वाजतोय पीएमपीचा ‘बँड’
By admin | Updated: May 17, 2015 00:56 IST