शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

तीन ठेकेदारांना पीएमपीचे अभय

By admin | Updated: February 21, 2015 01:52 IST

करारानुसार वेळेत बस न देणाऱ्या तीन ठेकेदारांचा ठेका रद्द करण्याचा पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाने संचालक मंडळासमोर ठेवलेला प्रस्ताव फेटाळण्यात आला.

पुणे : करारानुसार वेळेत बस न देणाऱ्या तीन ठेकेदारांचा ठेका रद्द करण्याचा पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाने संचालक मंडळासमोर ठेवलेला प्रस्ताव फेटाळण्यात आला. ठेकेदारांनी भाडेतत्त्वावर पीएमपीला बस देण्यास मंडळाने हिरवा कंदील दाखविला आहे. काही महिन्यांपूर्वी याच कारणास्तव एका ठेकेदाराचा ठेका रद्द करणाऱ्या संचालक मंडळाने या तीन ठेकेदारांबाबत घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पीएमपी संचालक मंडळाची शुक्रवारी सकाळी महापालिकेत बैठक झाली. या बैठकीत तीन ठेकेदारांच्या बस ताफ्यात घेण्यावरून बरीच चर्चा झाली. बस देण्यास मुदतीपेक्षा उशीर केल्याने एका ठेकेदाराचा ठेका संचालक मंडळाने रद्द केला होता. त्याच्याकडील ११० बस संबंधित तीन ठेकेदारांना समान पद्धतीने देण्यात आल्या. त्या वेळी झालेल्या करारानुसार संबंधित ठेकेदारांना सर्व बस पीएमपीच्या सेवेत आणण्यासाठी ठरावीक कालावधी देण्यात आला होता. मात्र, तीनही ठेकेदारांनी मुदतीत एकही बस पीएमपीच्या सेवेत आणली नाही. परिणामी, प्रशासनाने त्यांचा ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव मंडळासमोर मांडला होता. यावर बैठकीत जोरदार चर्चा झाली. काही सदस्यांनी, ठेका रद्द न करण्याची भूमिका मांडली. अखेर या प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. त्यानंतर ५ विरुद्ध २ अशा मतांनी हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. याविषयी अधिक माहिती देताना पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी म्हणाले, संचालक मंडळाच्या बैठकीत हा विषय मांडण्यात आला होता. आधीच्या एका ठेकेदाराचा ठेका बस वेळेत न मिळाल्यानेच रद्द करण्यात आला होता. त्याचीच माहिती देत प्रशासनाने आपली बाजू मंडळासमोर मांडली. तीन ठेकेदारांबाबतही तशीच परिस्थिती आहे, असे सांगण्यात आले. मात्र यावर मतदान होऊन प्रस्ताव नाकारण्यात आला. या ठेकेदारांना दंड आकारून बस ताफ्यात घेण्याचा निर्णय बैठकीत झाला. (प्रतिनिधी)५० मिनीबसेसच्या खरेदीला मान्यताशहरातील दाट लोकवस्ती व अरुंद रस्ते असलेल्या भागात सोयीस्कर ठरणाऱ्या ५० मिनीबस खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंडळाने मान्यता दिली आहे. त्यासाठी पीएमपीने निविदा प्रक्रिया राबविली होती. यात एका खासगी कंपनीने प्रतिबस सर्वात कमी ३७ लाख रुपयांची निविदा भरली होती. त्याला बैठकीत मान्यता दिली. या कंपनीला कामाची आॅर्डरही देण्यात आली. तसेच बीआरटीसाठीच्या इंटिलिजिंट ट्रांझिस्ट मॅनेजमेंट सिस्टिमलाही मान्यता मिळाल्याचे डॉ. श्रीकर परदेशी यांनी सांगितले.