शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पीएमआरडीए मार्गावर;मेट्रो मात्र चर्चेच्या फे:यात

By admin | Updated: November 25, 2014 23:18 IST

पुणो महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्थापन करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येणार

पुणो : पुणो महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्थापन करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येणार असून, हे प्राधिकरण केवळ नियोजानापूरेि न ठेवता त्याला एमएमआरडीएच्या धर्तीवर आर्थिक स्त्रोत निर्माण करण्यासाठी विविध पर्यायाचा विचार करण्यात येणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी सांगितले. मात्र, मेट्रोविषयी दोन मतप्रवाह असल्याने त्याविषयी चर्चा करून समजून घेणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. 
नागपूर येथील मेट्रोविषयी एकमत होते. परंतु, पुणो मेट्रोविषयी दोन प्रवाह आहेत. त्यामुळे मेट्रोविषयीची मते समजून घेवून निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. त्यामुळे गेल्या पाच वर्षापासून रखडलेली मेट्रो पुन्हा एकदा चर्चेच्या फे-या अडकणार असून, केंद्राच्या मान्यतेसाठी अंतिम टप्प्यात असलेला प्रस्ताव पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 
दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशन (डीएमआरसी)ने महापालिकेला 2क्क्7 मध्ये मेट्रोचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर महापालिकेने हरकती-सूचनांच्या सुनावणीसह मेट्रोचा प्रस्ताव मंजूर करून 2क्1क् मध्ये राज्य शासनाला सादर केला. त्यामध्ये वनाज ते रामवाडी या एकाच मार्गाचा समावेश प्रस्ताव दाखल केला होता. त्यानंतर दोन्ही महापालिकांच्या हद्दीतून जाणा-या पिंपरी ते स्वारगेट या दुस-या मेट्रो मार्गासह प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला. राज्य शासनाकडून  पुणो व नागपूर असे दोन्ही प्रस्ताव केंद्र शासनाकडे एकावेळी पाठविण्यात आले होते. परंतु, लोकसभा निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केवळ नागपूर मेट्रोचा निर्णय घेतला होता. त्यावेळी पुणो मेट्रोच्या प्रस्तावात अनेक त्रुटी असल्याचे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले होते. 
दरम्यान, केंद्र शासनाने काढलेल्या त्रुटी दूर करून महापालिकेने आठवडय़ापूर्वी पुन्हा एकदा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे.  (प्रतिनिधी)
 
पीएमपीला स्वतंत्र  अधिकारी देणार..
पुणो व पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्नांविषयी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौन्सील हॉल येथे आज बैठक घेतली. त्यावेळी दोन्ही शहरातील खासदार, आमदार, नगर विकास खात्याचे सचिव, विभागीय आयुक्त विकास देशमुख, जिल्हाधिकारी सौरभ राव व आयुक्त कुणाल कुमार आदी उपस्थित होते. त्यावेळी पीएमपीला आठवडय़ाभरात स्वतंत्र आयएएस दर्जाचा अधिकारी देणार आहे. मुंबईप्रमाणो रेल्वे विभागाला सहभागी करून पुण्यातील वाहतुकीचे नियोजन करणार आहे. दोन्ही महापालिकेतून जाणा-या पीएमपीच्या वाहतुकीचा एकात्मिक मॉस्टर प्लॅन तयार करण्यास अधिका-यांना सांगितले आहे. कच-याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येणार आहे.