शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

अनधिकृत बांधकामांवर पीएमआरडीएचा हातोडा

By admin | Updated: June 21, 2017 06:20 IST

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मोहीम तीव्र केली आहे. त्यानुसार अनधिकृत बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मोहीम तीव्र केली आहे. त्यानुसार अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी खेड तालुक्यात मोई येथे मंगळवारी (दि. २०) आठ व्यापारी गाळे व आठ रहिवासी गाळे अशी एकूण ४,५०० चौरस फुटावरील अनधिकृत बांधकामे भुईसपाट केली. या भागातील अनधिकृत बांधकामांना नोटिसाही बजावल्या आहेत.मोई (ता. खेड) येथील एमआयडीसीजवळील विठ्ठल करपे यांच्या मालकीची जमीन गट नंबर ४६२ येथील ४,५०० चौरस फुटावरील अनधिकृत बांधकामावर ही कारवाई करण्यात आली. या धडक कारवाईपूर्वी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १६६चे कलम ५३ (१) अन्वये संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र तरीही संबंधित बेकायदा बांधकामे काढून न घेतल्याने मंगळवारी सकाळी साडेआठ ते दुपारी बारादरम्यान जेसीबीच्या साह्याने कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही धडक कारवाई करण्यात आली. ही कारवाई पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, तहसीलदार अर्चना यादव, उपअभियंता वसंत नाईक, आळंदी मंडल अधिकारी डी. सी. कारकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या वेळी चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज यादव, उपनिरीक्षक महेश मुंडे, श्रीधर जगताप, शंकर कुलकर्णी, पोलीस पाटील नारायण बिडकर, पोलीस कर्मचारी यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की या अनधिकृत बांधकामांना प्राधिकरणाने मार्च २०१७मध्ये नोटीस बजावली होती. सदरच्या बांधकामधारकांनी नोटिसीला काहीही उत्तर दिले नव्हते. त्यामुळे नोटिशीनुसार कारवाईस अंतिम स्वरूप देण्यात आले. दरम्यान खेड तालुक्यातील अनधिकृत बांधकामांवर प्राधिकरणाने केलेली ही पहिलीच धडक कारवाई आहे. पीएमआरडीएच्या वतीने अशी बांधकामे शोधून संबधित बांधकामांचे पंचनाम्याचे काम प्राधिकरणाच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून करण्यात येत आहे.