दीपक जाधव ल्ल पुणो
पुणो महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी)च्या बसदुरुस्तीवर दर महिन्याला सरासरी 75 लाख रुपये खर्च केले जातात, तरीही 65क् बस दुरुस्तीअभावी बंद ठेवण्यात आल्या असल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे. पीएमपीच्या दुरुस्तीवर होणारा हा खर्च नेमका कुठे जातो, अगदी हजार रुपयांच्या खर्चासाठीही बस बंद का ठेवण्यात आल्या आहेत आदी प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.
पीएमपीच्या 1,25क् बस आहेत. त्या अपु:या पडत असल्याने ठेकेदारांकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या 85क् बस घेण्यात आलेल्या आहेत. पीएमपीच्या बसवर किती खर्च होतो, याची माहिती माहिती अधिकारात दिलेली आहे. त्यांना पीएमपीने दिलेल्या माहितीतून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
पीएमपी बसच्या स्पेअरपार्टवर दर महिन्याला सरासरी 5क् लाख 41 हजार 48 रुपये खर्ची पडत आहेत. त्याचबरोबर, एप्रिल 2क्14 ते ऑगस्ट 2क्14 या कालावधीत बसच्या टायर खरेदीवर 1 कोटी 72 लाख 55 हजार 933 रुपये खर्च आला. महिन्याला सरासरी टायर खरेदीसाठी 28 लाख रुपये खर्ची पडले आहेत. याशिवाय, टायर रिमोल्डचा खर्च वेगळाच आहे. 1 सप्टेंबर 2क्13 ते 3क् सप्टेंबर 2क्14 या कालावधीत 9 हजार 971 टायर रिमोल्ड करण्यात आले आहेत.
पीएमपीच्या दुरुस्तीसाठी पैसे नसल्याने साडे 6क्क् बस बंद अवस्थेत आहेत. दरमहा 75 लाखांपेक्षा जास्त खर्च होत असूनही बसची दुरुस्ती का होत नाही, असा प्रश्न पीएमपीच्या कर्मचा:यांकडून उपस्थित केला जात आहे. लोकहित फाउंडेशनचे
अजहर खान यांनी ही माहिती मागविली होती.
पीएमपीची स्थापना होऊन अनेक वष्रे उलटली, तरी तिच्या स्थापनेमागचा उद्देश मात्र अजूनही साध्य झालेला नाही. हजारो प्रवासी असतानाही पीएमपी बसची स्थिती खराबच असून, या खिळखिळ्या बसमधून दररोज प्रवास करावा लागत आहे. तर दुसरीकडे सुस्त आणि भ्रष्ट प्रशासन बसच्या देखभालीकडे लक्ष देण्याऐवजी नको तिथे पैसे खर्च करीत असल्याचे चित्र आहे आणि विशेष हे, की हा खर्च अव्याहत सुरू आहे; मात्र बसची दुरवस्था आहे तशीच आहे. हे चित्र कधी बदलणार, अशी विचारणा प्रवासी करीत आहेत.
पीएमपीच्या कर्मचा:यांना रोज काम मिळावे, या मागणीकरिता महाराष्ट्र कामगार मंचच्या वतीने गुरुवारपासून उपोषण सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये 25क् कर्मचा:यांनी सहभाग घेतला आहे. या उपोषणामध्ये आता कर्मचा:यांचे कुटुंबीयदेखील शुक्रवारपासून सहभागी होणार असल्याचे दिलीप मोहिते यांनी सांगितले.
खर्ची पडणारे पैसे जातात कुठे?
पीएमपी प्रशासनाने माहिती अधिकारात दिलेल्या उत्तरानुसार ते जर महिन्याला 75 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च दुरुस्तीसाठी करीत आहेत, तर मग दुरुस्तीअभावी इतक्या बस बंद का आहेत? दुरुस्तीसाठी खर्ची पडणारे हे लाखो रुपये जातात कुठे, याचा हिशेब पीएमपीने द्यावा. पीएमपीची माहिती नसलेल्या अधिका:यांकडे त्याची सूत्रे गेल्याने हा गोंधळ होत आहे.
- दिलीप मोहिते, अध्यक्ष, महाराष्ट्र कामगार मंच
दोन वर्षापासून कामगारांना गणवेश नाही
पीएमपीमधील प्रत्येक कामगाराला दर वर्षी दोन गणवेश देण्याबाबत करार करण्यात आला आहे. मात्र, 2क्12पासून कोणत्याही कामगाराला गणवेश देण्यात आलेला नाही. तसेच त्यांना गमबूट, रेनकोट, हिवाळी जर्सीही देऊ न शकल्याचे पीएमपीकडून देण्यात आलेल्या उत्तरात नमूद केले आहे. भांडारात मोठय़ा प्रमाणात गणवेशाचे कापड पडून आहे. पांढरे रंगाचे 64 मीटर, लाल रंगाचे 969 मीटर, खाकी 4क्8 मीटर, निळे ब्ल्यू ड्रल 2 हजार 466 मीटर कापड भांडारात शिल्लक आहे.