शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

पीएमपीची जलद बससेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:11 IST

पुणे : लांबपल्ल्याच्या मार्गावरील प्रवास जलद गतीने होण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने ११ प्रमुख मार्गांवर जलद बससेवा सुरू करण्याचा ...

पुणे : लांबपल्ल्याच्या मार्गावरील प्रवास जलद गतीने होण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने ११ प्रमुख मार्गांवर जलद बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गांवर ई-बस सोडण्यात येणार असून केवळ ठराविक थांब्यांवरच बस थांबविली जाणार आहे. ही सेवा २५ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी दिली.

पीएमपीकडून लांबपल्ल्याच्या अनेक मार्गांवर बस सोडण्यात येतात. पण अनेक थांबे असल्याने या मार्गांवर शेवटच्या थांब्यापर्यंत पोहण्यासाठी बराच वेळ जातो. तसेच या बसला गदीर्ही वाढते. या पार्श्वभुमीवर पीएमपी प्रशासनाने प्रायोगिक तत्वावर ११ मार्गांवर जलद बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गांवर काही प्रमुख थांब्यांवर बस थांबविणार आहे. म्हणजे कात्रज ते निगडी या मार्गावर पूर्वी ५९ थांबे होते. आता केवळ १३ मार्गांवरच बस थांबेल. त्यासाठी तिकीट दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

जलद बससेवेमुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. अशी सेवा यापुर्वीच मुंबईत बेस्टने सुरू केली आहे. पुण्यामध्ये पहिल्यांदाच ही सेवा सुरू होत आहे. प्रवासी वाढ करण्यासाठीही या सेवेचा फायदा होणार आहे. या मार्गांवर ३० ते ६० मिनिटांदरम्यान प्रवाशांना बस उपलब्ध होऊ शकेल, असे जगताप यांनी सांगितले.

--

जलद बस मार्ग व वारंवारिता

मार्ग (कंसात मार्ग क्रमांक) वारंवारिता (मिनिटे)

कात्रज ते निगडी (४२) ४५

भेकराऊनगर ते एनडीए गेट (६४ ब) ४०

भेकराईनगर ते निगडी (१३९ अ) ६०

भेकराईनगर ते निगडी (१४९) ४०

भेकराईनगर ते आळंदी (२०१) ४५

भेकराईनगर ते चिंचवडगांव (२०४) ४०

भेकराईनगर ते हिंजवडी माण फेज ३ (२०८) ६५

भेकराईनगर ते कात्रज (३०१) २५

निगडी ते वाघोली (३३६) ५०

निगडी ते पुणे स्टेशन (३४८) ४५

निगडी ते हिंजवडी (३७२) ४०