शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीचा सीएनजी गॅसपुरवठा बंद करणार

By admin | Updated: June 3, 2015 04:50 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) सीएनजीवरील बसेसला गॅसपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीने गुरुवारपासून

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) सीएनजीवरील बसेसला गॅसपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीने गुरुवारपासून गॅसपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे. पीएमपीकडे तब्बल ३५ कोटी रुपये थकल्याने कंपनीने हा निर्णय घेतल्याची माहिती कंपनीचे मुख्य महाव्यवस्थापक मिलिंद शेट्टीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. हे संकट टाळण्यासाठी पीएमपीकडे एकच दिवस शिल्लक राहिला आहे; अन्यथा पीएमपीची बससेवा कोलमडून जाण्याची शक्यता आहे.पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात २१०० बस असून, त्यांपैकी सुमारे १२०० बस सीएनजी गॅसवर चालणाऱ्या आहेत. या बसला ‘एमएनजीएल’मार्फत २००९ पासून गॅसपुरवठा केला जातो. पीएमपीच्या खर्चात बचत होत असल्याने प्रशासनाने सीएनजी बसेसला अधिक प्राधान्य दिले आहे. या बसेससाठी दर दहा दिवसाला सुमारे ३ कोटी रुपयांचा गॅस लागतो. मात्र, मागील काही महिन्यांपासून ‘पीएमपी’ने गॅसचे पैसे न दिल्याने कंपनीने आता गॅस पुरविण्यास असमर्थता दर्शविली आहे. येत्या गुरुवारपासून पीएमपीचा गॅसपुरवठा बंद करण्याचा इशारा कंपनीने दिला आहे. याविषयी ‘लोकमत’शी बोलताना शेट्टीवार म्हणाले, की पीएमपीकडून दोन दिवसांत एकही धनादेश मिळालेला नाही. पीएमपीकडून चुकीची माहिती दिली जात आहे. पीएमपीकडे सुमारे ३५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. पीएमपीकडून कधीही वेळेवर पैसे दिले गेले नाहीत. सातत्याने पाठपुरावा करून थकबाकी वाढतच गेली आहे. ही थकबाकी खूप मोठी आहे. त्यामुळे आता आम्हालाही गॅसपुरवठा करणे अशक्य होऊ लागले आहे. ही थकबाकी वाढत गेली तर मुख्य कंपनीतून गॅस मिळणे बंद होईल. त्याबाबत पीएमपीसह कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. पैसे न मिळाल्यास गुरुवारपासून गॅसपुरवठा बंद करण्यावर आम्ही ठाम आहोत.